पुणे, दि. १०- पुणे इलेक्ट्रिक असोसिएशनच्या (तपकीर गल्ली) वतीने आयोजित शिबिरात १२२ जणांनी रक्तदान केले. साधू वासवानी मिशनच्या मेडिकल कॉम्प्लेक्स संचालित इनलॅक अँड बुधरानी हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने तपकीर गल्लीतील पुणे इलेक्ट्रिक असोसिएशनच्या सभागृहात आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद (Spontaneous response to the camp organized at the Pune Electric Association auditorium in Tapkir Galli in collaboration with Inlak and Budhrani Hospital Blood Bank, operated by Sadhu Vaswani Mission Medical Complex ) मिळाला.
पुणे इलेक्ट्रिक असोसिएशनचे (तपकीर गल्ली) अध्यक्ष सुरेश जेठवानी, (Suresh Jethwani, President of Pune Electric Association (Tapkir Galli)) उपाध्यक्ष हरेश कुकरेजा, सचिव हेमंत शाह, सहसचिव दीपक वाधवानी व सचिन तलरेजा, खजिनदार मनजीत धुपार, कार्यकारिणी सदस्य दिनेश शहा, विजय दासवानी, मुकेश जेठवानी, शीतल ओसवाल, रवी सलुजा, भूषण भोमावत आदी उपस्थित होते. निलेश तेजवानी यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
सुरेश जेठवानी म्हणाले, “पुणे इलेक्ट्रिक असोसिएशन (तपकीर गल्ली) ही इलेक्ट्रिक व्यापाऱ्यांची संस्था १९९० पासून कार्यरत असून, अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन नियमितपणे केले जाते. २८० पेक्षा अधिक आजीवन सदस्य आहेत. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत घेण्यात येतात.”