गुरुपौर्णिमेच्या दिवशी आनंदाश्रमात शिवसेनेचा मेगा पक्षप्रवेश

गुरुपौर्णिमेच्या दिवशी आनंदाश्रमात शिवसेनेचा मेगा पक्षप्रवेश

 
‘प्रॉमिसिंग पुणे’चा संकल्प करत चळवळीतील कार्यक्षम कार्यकर्त्यांचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार
 
पुणे, दि. १०- उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्यानंतर होणाऱ्या राजकीय परिणामाची राज्यभर उत्सुकता असतानाच पुण्यातील विविध संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळांत कार्यरत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील आनंदाश्रमात हा मेगा पक्षप्रवेश सोहळा रंगणार आहे. (  This mega party induction ceremony will be held at the Anandashramat in Tembhinaka, the home of the late Anand Dighe.)    खुद्द एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. सकारात्मक आणि रचनात्मक काम करत आपली रेष मोठी करण्यात माहीर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ही अनोखी रणनीती अंमलात आणली आहे.
 
‘प्रॉमिसिंग पुणे’चा संकल्प करीत वंदेमातरम संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष, ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे कार्यकारी अध्यक्ष, ‘#व्हायरल_माणुसकी’ पुस्तकाचे लेखक, वक्ते आणि निवडणुक व्युहरचनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले वैभव वाघ यांच्यासह पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्निल नाईक, गेली ३० वर्षे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणारे अनुभवी क्रिडासंघटक उमेश गालिंदे, आरोग्य क्षेत्रातील कामासाठी वस्ती भागांमध्ये ‘हक्काचा कार्यकर्ता’ अशी प्रतिमा असलेले अभिमन्यू मैद आणि सुधीर ढमाले, हॉटेल कामगारांच्या न्याय हक्कसाठी कार्यरत असलेले संदेश पावसकर, विद्यार्थी चळवळीतील युवा कार्यकर्ते अथर्व पिसाळ, ७५००० किलो गोमांसाची तस्करी रोखल्यामुळे महाराष्ट्रात गाजलेले निलेश जाधव, स्वत: कॅन्सरशी यशस्वी दोन हात केल्यानंतर आता पूर्णवेळ कॅन्सर रुग्णांसाठी मोफत समुपदेशन करणारे कॅन्सरयोध्दा युनुस सय्यद, सतिश शिंदे, मातंग समाजाच्या युवक चळवळीत प्रसिध्द असलेले विजय गालफाडे, युवा उद्योजक दत्ता मानकर, माजी नगरसेवक अनिल बटाणे, देवेंद्र शेळके, गोरख बांदल, गौरव नवले, अनिकेत उतेकर, ओंकार मालुसरे, महेश चव्हाण, योगेश राजपुत, महेश सुर्यवंशी यांचा समावेश आहे.
विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातून या अष्टपैलू टीमच्या प्रवेशाचे ‘ऑपरेशन टायगर’ घडवून आणण्यासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

वैभव वाघ म्हणाले, “चिपळूण पूर, इर्शाळवाडी, पहलगाम अतिरेकी हल्ला अशा नैसर्गिक आणि राष्ट्रीय आपत्तींवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम खूप जवळून पाहिले होते. त्यामुळे राज्यात, पुणे शहरात काही रचनात्मक काम करायचे, तर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात करावे, हा विचार माझ्यासह सहकाऱ्यांच्या मनात आला. गेली २० वर्षे ज्यांना गुरु मानून काम करत आहे, त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमात शिवसेनेत प्रवेश करण्याची संधी मिळतेय, ही गोष्ट भारावणारी आहे. शिवसेनेचा भगवा हाती घेत एक सकारात्मक आणि रचनात्मक राजकीय चळवळ पुणे शहरात, राज्यात सुरु करण्याचा आमचा मानस आहे.”

  (Shiv Sena city chief Pramod Bhangire, who played a key role in creating ‘Operation Tiger’, said)      ‘ऑपरेशन टायगर’ घडवण्यात महत्वाची भूमिका निभावणारे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले, “या मेगा प्रवेशाला एक वेगळे महत्व आहे. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन हजारो प्रवेश शिवसेनेत रोज होत आहेत; पण यातले बहुतांशी लोक हे राजकीय पार्श्वभूमी असलेले आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ राजकीय पार्श्वभूमी नसलेले आणि केवळ समाजात मुळाशी जाऊन काम करणाऱ्या आणि समाजात विश्वासार्ह प्रतिमा असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचे आहे. या अष्टपैलू टीमच्या कल्पनेतून लवकरच पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पुण्यात ‘प्रॉमिसिंग पुणे’ अभियानाची सुरुवात होणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *