पंढरपूर, दि. ६- आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केली. ( On the occasion of Ashadhi Ekadashi, the state Chief Minister Devendra Fadnavis performed the official worship of Pandurang at the Vitthal Rukmini Temple in Pandharpur today. ) देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या. पहाटे ३ च्या दरम्यान विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. त्यानंतर रुक्मिणी मातेच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
Navigation
- Home
- पश्चिम महाराष्ट्र
- महाराष्ट्र
- पुणे
- Ashadhi wari 2025: आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी माऊलीला साकडं