पुणे, दि. २२- पुणे विद्यार्थी गृहाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, पुणे या अभियांत्रिकी महाविद्यालयास स्वायत्त दर्जा बहाल करण्यात आला. महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून शैक्षणिक स्वायत्तता लागू करण्यात आली असून यासंदर्भातील अकॅडमिक कौन्सिलची बैठक नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीस महाविद्यालयाचे संचालक सुनील रेडेकर व प्रा. राजेंद्र कडुस्कर, प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे, सर्व विभागप्रमुख, डीन इंडस्ट्री इन्स्टिट्यूट सेल, डीन अकॅडमीक, परीक्षा नियंत्रक, बोर्ड ऑफ स्टडीजचे प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी तसेच विशेष निमंत्रित सदस्य उपस्थित होते.(The Academic Council meeting was held successfully recently. The meeting was attended by the college directors Sunil Redekar and Prof. Rajendra Kaduskar, Principal Dr. Manoj Tarambale.)
यासोबतच, निमंत्रित सदस्य म्हणून आयआयआयटी प्रयागराजचे संचालक डॉ. मुकुल सुतावणे, आयआयटी मुंबईच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक डॉ. विक्रम गद्रे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. अनुपमा कुंभार, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समधील सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे संचालक प्रा. डॉ. गुरुदास नुलकर, एआय आधारित मार्केटिंग कन्सल्टंट व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. अमेय पांगारकर उपस्थित होते.
या बैठकीत प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रम, प्रथम वर्ष व्यवस्थापन अभ्यासक्रम, प्रथम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रम – इलेक्ट्रिकल आणि प्रिंटिंग विभाग, महाविद्यालयाचे शैक्षणिक व परीक्षा नियम आदी गोष्टीना अधिकृत मान्यता देण्यात आली. ही बैठक संस्थेच्या शैक्षणिक स्वायत्ततेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे, असे संचालक सुनील रेडेकर यांनी नमूद केले.