महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

 
 
पुणे  दि. १७-  महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. अनुरुद्र चव्हाण, तर उपाध्यक्षपदी ॲड. ज्ञानेश्वर नरवडे यांची निवड      (Adv. Anurudra Chavan elected as President of Maharashtra Tax Practitioners Association, while Adv. Dnyaneshwar Narwade elected as Vice President)  झाली आहे. संस्थेच्या ‘ज्ञानमंदिर’ सभागृहात नुकत्याच झालेल्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२५-२६ या वर्षाकरिता नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये ॲड. कैलास काशीद, सीएमए नवनाथ नलवडे, उमेश दांगट, ॲड. प्रणव शेठ, सीए योगेश इंगळे, सुभाष घोडके, सीए परीक्षित औरंगाबादकर, मिलिंद हेंद्रे, नेहा नाणेकर यांचा, तर स्वीकृत सदस्य म्हणून अश्विनी बिडकर व विनोद रहाते यांचा समावेश आहे.
 
यावेळी संस्थेचे मावळते अध्यक्ष ॲड. प्रसाद देशपांडे, माजी अध्यक्ष ॲड. नरेंद्र सोनावणे, सीएमए श्रीपाद बेदरकर, सीएमए बी. एम. शर्मा, प्रकाश पटवर्धन, मनोज चितळीकर, ॲड भारत डिंबले, संतोष शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी ‘एमटीपीए मेरुमणी’ पुरस्काराने सीएमए श्रीपाद बेदरकर यांना, तर ‘एमटीपीए कोहिनुर’ पुरस्काराने सीएमए प्रकाश रिझवानी, अनिल चव्हाण, संतोष सहर्म व अनिल वखारिया यांना सन्मानित करण्यात आले. कृतज्ञता सन्मान सीए मिलिंद काळे यांना प्रदान करण्यात आला.
 
कर सल्लागार संस्था आपल्या कार्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. दोन हजाराहून अधिक मान्यवर सभासद आहेत. संस्थेकडून सर्व कर सल्लागार, सनदी लेखापाल आदींना कर रचनेतील विविध बदल याबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांबाबत सरकारच्या विविध योजनांचा प्रसार केला जातो. संस्थेचे हे कार्य नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ॲड. अनुरुद्र चव्हाण यांनी नमूद केले.
 
कर सल्लागार संस्थेने गेल्या वर्षात राबवलेल्या उपक्रमाविषयी, तसेच विविध मान्यवर संस्थांशी झालेल्या सामंजस्य करार, प्राप्तिकर, जीएसटी यावर विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम, ज्ञान अमृत कुंभ राष्ट्रीय परिषद व अन्य कार्यक्रमाचा आढावा घेतला. सर्व सहकाऱ्यांचे यामध्ये मोलाचे सहकार्य लाभले. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, अशा भावना ॲड. प्रसाद देशपांडे यांनी व्यक्त केल्या. ॲड. प्रणव शेठ व ॲड. ज्ञानेश्वर नरवडे यांनी सूत्रसंचालन केले.
 
१) शिवाजी रस्ता : महाराष्ट्र टॅक्स प्रकटीशर्न्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा कार्यभार मावळते अध्यक्ष ॲड. प्रसाद देशपांडे यांच्याकडून स्वीकारताना ॲड. अनुरुद्र चव्हाण. प्रसंगी डावीकडून ॲड. कैलास काशीद, चव्हाण, देशपांडे, ॲड. ज्ञानेश्वर नरवडे व सीएमए नवनाथ नलवडे.
 
 
२) शिवाजी रस्ता : महाराष्ट्र टॅक्स प्रकटीशर्न्स असोसिएशनची नवनिर्वाचित कार्यकारिणी. प्रसंगी डावीकडून (बसलेले) मनोज चितळीकर, सीएमए श्रीपाद बेदरकर, ॲड. प्रसाद देशपांडे, ॲड. अनुरुद्र चव्हाण, ॲड. नरेंद्र सोनावणे, ॲड. ज्ञानेश्वर नरवडे व ॲड. प्रणव शेठ. (उभे) विनोद रहाते, सीएमए नवनाथ नलवडे, सुभाष घोडके, उमेश दांगट, अश्विनी बिडकर, नेहा नाणेकर, सीए परीक्षित औरंगाबादकर, मिलिंद हेंद्रे व ॲड. कैलास काशीद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *