पुणे, दि. 8- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय पुणे विभाग व ग्रीन सोल्युशन्स यांच्या वतीने प्लास्टिक मुक्तीसाठी वाकडेवाडी बसस्थानक परिसरात स्वच्छता व जनजागृती अभियान आयोजिले होते. प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन कार्यक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रीन सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळे यांच्या नेतृत्वात १०० हुन अधिक स्वयंसेवक यामध्ये सहभागी (More than 100 volunteers participated in this under the leadership of Sagar Ahivale, Managing Director of Green Solutions.) झाले होते.
या अभियानात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी बाबासाहेब कुकडे, उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, कार्तिकेय लंगोटे, प्रादेशिक संचालक प्रतीक भरणे, अतिरिक्त संचालक शशिकांत लोखंडे, निश्चल शेट्टी, डेपो व्यवस्थापक संजय वाळवे, ग्रीन सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळे व आरती भोसले आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व ग्रीन सोल्युशन या कंपनीतर्फे सर्वच कर्मचाऱ्यांमार्फत बॅनर्स घेऊन रॅली काढण्यात आली. प्लास्टिक बंदीचा निर्धार करून तशी प्रतिज्ञा सर्वांसोबत व सर्वांकडून म्हणून घेतली. तसेच बसस्थानक परिसरात पडलेले प्लास्टिक सर्वांनी मिळून गोळा केले व परिसर स्वच्छ केला गेला. बस स्थानकावर प्रवाशांना कापडी पिशवी वितरण करण्यात आले. यावेळी स्वयंसेवकांनी पथनाट्यातून जनजागृती केली. तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
(Sagar ahiwale said)सागर अहिवळे म्हणाले, “दैनंदिन जीवनात प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळावा. आजच प्लास्टिक बंदीचा निर्धार करूया व सुंदर हृदयाची सुरुवात करूया असा निर्धार केला. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळायला हवा.”