Pcmc – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवेतून माहे मे २०२५ अखेर अधिकारी,कर्मचारी असे एकूण ८८ जण सेवानिवृत्त

Pcmc – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवेतून माहे मे २०२५ अखेर अधिकारी,कर्मचारी असे एकूण ८८ जण सेवानिवृत्त

 

 महापालिका सेवेतून एक सह आयुक्त, आठ मुख्याध्यापक, दोन सह शहर अभियंता, एक सहाय्यक आयुक्त,चार सिस्टर इनचार्ज, एक कार्यकारी अभियंता, एक प्रशासन अधिकारी, तीन कार्यालय अधिक्षक,पाच वाहन चालक, सोळा मजूर, दहा सफाई कामगार अशा वर्गाचा सेवानिवृत्तांत समावेश

पिंपरी, दि. ३१ –  महापालिका सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, निरोगी आणि आनंदी जीवन जगावे तसेच आपल्या कुटुंबीयांना वेळ द्यावा. याशिवाय नोकरीदरम्यान राहून गेलेले पर्यटनासारखे आवडते छंद जोपासावेत असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील आनंदी व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे माहे मे २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या ८२ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ६ अशा एकूण ८८ कर्मचाऱ्यांचा    (On behalf of Pimpri Chinchwad Municipal Corporation, a total of 88 employees, 82 of whom will retire as per the prescribed age limit by the end of May 2025 and 6 who have taken voluntary retirement, will be retired at Prof. Ramkrishna More Auditorium in Chinchwad. ) अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे बोलत होते.

या कार्यक्रमास शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशिला जोशी, कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे तसेच अभिमान भोसले, मनोज माचरे आणि महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे मे २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सह शहर अभियंता संजय खाबडे, विजयकुमार काळे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत कोळप, कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, प्रशासन अधिकारी संजीव भांगले, मुख्याध्यापक राजाराम भागवत, ज्योती चिपाडे, शाहिदा सय्यद, सुरेखा भालचीम, सारिका कानडे, सुनिता घुले, अरुणा महानवर, क्रीडा पर्यवेक्षक अनिता केदारी, सुरक्षा निरीक्षक बापू लिम्हण, प्रमुख अग्निशमन विमोचक संजेश ठाकूर, आरोग्य निरीक्षक बाबासाहेब राठोड, मल्हारी काळे, कार्यलय अधीक्षक वंदना ठाकरे, रवींद्र भाट, सिस्टर इन्चार्ज सुवर्णा ताठे, वंदना बांगर, ललिता पोखरकर, शारदा पुंडे, लेखापाल उषा थोरात, मुख्य लिपिक गंगाधर थोरात, कनिष्ठ अभियंता अग्रू घेरडे, सहाय्यक शिक्षक मानसिंग जायपत्रे, उपशिक्षक सविता चव्हाण, सविता गायकवाड, भारती पवार, दिलीप थोरात, मंगल लांडे, अहिल्याबाई पाटील, गटनिर्देशक प्रकाश घोडके, अग्निशमन विमोचक अशोक पिंपरे, असिस्टंट मेट्रेन पंचशिला कांबळे, लॅब टेक्निशियन कैलास खांडगे, ऑपरेशन थिंएटर असिस्टंट अजय घोणे, वायरमन हिराचंद जगताप, बाबासाहेब साळवे, वाहन चालक देविदास अस्वरे, शंकर खुडे, बालाजी अय्यंगार, सुनील जगताप, प्रदीप हिले, वॉर्ड बॉय जवाहरलाल सुंदेचा, रखवालदार रवींद्र वाळूंजकर, देवजी भांगे, कैलास येलवंडे, पोपट गावडे, मुकादम आनंदा भगत, सुनिल गायकवाड, आशा जाधव, अविनाश वाघेरे, नाईक सुभाष भुजबळ, मजूर गुलाब गुजर, अशोक लांडे, बाबासाहेब तिकोणे, गोपाल काळभोर, अनिल इंगळे, तानाजी चौधरी, शिवशंकर शट्टर, पंडित देवकर, शंकर शिर्के, काळूराम कुदळे, रमेश मोरे, प्रीतम धनानी, बाळू फुगे, प्रभाकर पाडाळे, लक्ष्मण शिंदे, विश्वनाथ लांडगे, सफाई कामगार मंगल पोळपघट, लता धेंडे, अब्दुल रज्जाक कोरबू, नंदा खुडे, पांडुरंग मेमाणे, तुळजाबाई तायडे, बाळू दिंबर, शशिकला जंजाळे, गटरकुली दिलीप पाचारणे यांचा समावेश आहे.

तर स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये उप शिक्षक गीता कोडकणी, मुकादम शीला मोरे, सफाई कामगार संगीता बनसोडे, कल्पना नेटके, गटरकुली विठ्ठल शेलुकर, प्रभाकर ननवरे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *