सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्यावतीने शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्यावतीने शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली

 
 
पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १० वी, १२ वी परीक्षेत
विज्ञान विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
 
पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या स्मरणार्थ
‘सूर्यदत्त’ने साहित्य संमेलन भरवावे: डॉ. दीपक शिकारपूर

पुणे, दि. २१ –  पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया,  (  Founder Chairman of Suryadutt Education Foundation Prof. Dr. Sanjay B. Chordia) उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, प्रा. मनीषा कुंभार यांच्यासह सर्व विभागाचे संचालक आणि प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “डॉ. नारळीकर आणि डॉ. मंगला नारळीकर यांचे ‘सूर्यदत्त’शी जवळचे नाते होते. ( Dr. Narlikar and Dr. Mangala Narlikar had a close relationship with ‘Suryadutt’) त्यांच्या निधनाने सूर्यदत्त परिवारास अत्यंत दुःख झाले आहे. डॉ. जयंत नारळीकर यांना २००८, तर डॉ. मंगला नारळीकर यांना २०१७ मध्ये ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.  डॉ. नारळीकर यांच्या मार्गदर्शनात ‘सूर्यदत्त’च्या अनेक विभागाच्या वैज्ञानिक सहली ‘आयुका’मध्ये नेण्यात आल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीने हा संपूर्ण परिसर कुतूहलपूर्ण, शिकण्याजोगा आणि आदर्शवत झाला आहे. डॉ. नारळीकर ‘सूर्यदत्त’मधील अनेक कार्यक्रमासाठी प्रेरणास्त्रोत म्हणून उपस्थित राहत. तर डॉ. मंगला नारळीकर यांच्या हस्ते आर्यभट्ट सभागृहाचे उदघाटन करण्यात आले होते. डॉ. नारळीकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सीबीएसई व स्टेट बोर्डाच्या १० वी आणि १२ वी परीक्षेत विज्ञान विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.” ( In memory of Dr. Narlikar, scholarships will be given every year to the first-placed male and female students in science subjects in the CBSE and State Board 10th and 12th examinations.)

डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “डॉ. जयंत नारळीकर यांच्यासमवेत टाटा इन्स्टिट्युटमध्ये काम करता आले; त्यांना जवळून अनुभवता आले, याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो. सर्वसामान्याकरिता विज्ञान, खगोलशास्त्र, गणित, अंतराळ विज्ञान यासारखे विषय त्यांनी अत्यंत सहजतेने समजावून सांगितले. सामान्यांपर्यंत ज्ञान पोहोचविता यावे, याकरिता अत्यंत तळमळीने त्यांनी कार्य केले. माझ्या लिखाणामागची प्रेरणा तेच आहेत. डॉ. नारळीकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी ऑनलाइन भाषण केले होते. ‘सूर्यदत्त’ने त्यांच्या साहित्याचा गौरव करण्याकरिता साहित्य संमेलन भरविण्यात पुढाकार घ्यावा.”

प्रशांत पितालिया, हर्षदा कुंभार, अनघा सावंत यांनीही मनोगते व्यक्त केली. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *