सचिन विष्णू कांबळे यांचे निधन
पुणे, दि. ११ मे- कसबा पेठ येथील सम्राट अशोकनगरमधील रहिवाशी, पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी कालकथित सचिन विष्णु कांबळे (वय ४०) यांचे (sachin kamble) अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, भाऊ-बहिणी असा परिवार आहे. महापालिकेतील नोकरीसोबतच कांबळे यांचा सामाजिक उपक्रमांतही सक्रिय सहभाग होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती पुणे जिल्हा अध्यक्ष संघदिप शेलार यांचे ते मामेभाऊ होते.