निर्भीडपणे, आत्मविश्वासाने यशोमार्गावर चालत राहा: डॉ. कोहिनकर(dr. Kohinkar))

निर्भीडपणे, आत्मविश्वासाने यशोमार्गावर चालत राहा: डॉ. कोहिनकर(dr. Kohinkar))

 
जागतिक मातृदिनानिमित्त मीडिया वर्ल्ड, साई बिझनेस क्लब यांच्यातर्फे ‘भारत की बेटी २०२५’ पुरस्कार सोहळा
 
पुणे, दि. ११-  “आई आपल्या जन्माचे मूळ असते. तिच्या वात्सल्य, संस्कारातून आपण घडतो. तिने दाखवलेल्या सन्मार्गावर चालत निर्भीडपणे व आत्मविश्वासाने यशोमार्गाकडे जायला हवे. आईच्या ऋणांतून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही. त्यामुळे तिचे थोर उपकार कायम स्मरणात ठेवून समाजात स्त्रीसन्मान जपला पाहिजे,” असे प्रतिपादन माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी केले.
 
जागतिक मातृदिनाचे (मदर्स डे)  (Mother’s day)औचित्य साधून आयोजित ‘भारत की बेटी’ पुरस्कार सोहळ्यात डॉ. कोहिनकर बोलत होते. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात मीडिया वर्ल्ड आणि साई बिसनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रसिद्ध अभिनेता देव गिल, (actor dev gil) स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम, कृषी अधिकारी श्रीकृष्ण सावंत, लेफ्टनंट कर्नल (नि.) समीर कुलकर्णी, शशिकांत धुमाळ गुरुजी, त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनच्या संस्थापिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे, ‘मीडिया वर्ल्ड’चे संचालक सुमित जैन, साई बिझनेस क्लबच्या डॉ. कृती वजीर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनीषा पवार, मधुरा कानडे, सुवर्णा माने, आशना खोसला, मनीषा जगताप, सुनंदा पाटील, सारिका बांगर, अश्विनी पटेल, स्वप्नजा लोमटे, संगीता समुद्रे, अपेक्षा वायाळ, सायली ढोले, रुपाली इंगळे, अयोध्या टिळक, शीतल गोळे, डॉ. नीलिमा भारद्वाज, भाग्यश्री देशपांडे, रितू कैला, स्वाती माहेश्वरी, निशा काटे, निशा माने, निर्मला शेळके, मोनाली गुल्हाने, अंजली मानेकर, रूपा जाधव, सोनाली चौगुले, मनिषा रायरीकर, शुभांगी कांदे, डिंपल इंगळे, अंशू जोहरी, गीतसानिया कुलकर्णी, नेहा मराठे, प्राजक्ता जाधव, संगीता शिंदे, पूनम मांढरे, गौरी मोटे, यमुना शिवतारे, धनश्री साखरे, प्रियंका सूर्यवंशी, आरती महाले, कांचन कडू यांना ‘भारत की बेटी २०२५’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  सन्मानचिन्ह, मानपत्र, पदक आणि तिरंगा शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.

 
शशिकांत धुमाळ गुरुजी यांनी सर्व उपस्थितांना शुभाशीर्वाद दिले. अश्विनी कदम यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करीत यापेक्षा आणखी चांगले यश प्राप्त करण्याचा सल्ला दिला. देव गिल (dev gil) यांनी कोणतेही काम करताना सचोटी, जिद्द आणि अथक परिश्रम खूप गरजेचे असल्याचे नमूद केले. श्रीकृष्ण सावंत, समीर कुलकर्णी यांनीही मनोगते व्यक्त केली.

 
हा फक्त एक पुरस्कार सोहळा नसून भारत देशाला उज्ज्वल भविष्य देऊ पाहणाऱ्या प्रत्येक माता आणि भगिनींचा सन्मान आहे. जात-पात धर्म बाजूला ठेवून राष्ट्रप्रथम हा संस्कार रुजवण्याचे काम आईच करू शकते. ‘भारत की बेटी’ (Bharat Ki Beti)   हा उपक्रम अनेकांना प्रेरणा देईल, अशी भावना सुमित जैन यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली.
सूत्रसंचालन गौरी देशपांडे आणि शेख निम्रा यांनी केले. आभार डॉ. कृती वजीर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *