हौशी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण छायाचित्रांचे १४ पासून प्रदर्शन

हौशी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण छायाचित्रांचे १४ पासून प्रदर्शन

 
 
पुणे, दि. १० –  ज्येष्ठ हौशी, मनस्वी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण आणि पारितोषिक प्राप्त छायाचित्रांचे प्रदर्शन पुणेकरांना पाहण्याची पर्वणी आहे. येत्या १४ ते २१ मे २०२५ या कालावधीत कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीमध्ये असलेल्या पु. ना. गाडगीळ अँड सन्स कला दालनात हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (ता. १४) सकाळी ११.३० वाजता अभिनेत्री व निर्माती, कलाकार भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते होणार आहे.
 
गेल्या ५५ वर्षांपासून रमेश करमरकर यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला आहे. बेलोज कॅमेऱ्यापासून ते मिररलेस कॅमेऱ्याच्या वापरातून त्यांनी विविध देशांतील जीवनशैली, तेथील निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक वैभव आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रथम पारितोषिकासह भारत सरकार व इतर अनेक नामांकित संस्थांची पारितोषिके त्यांच्या अनेक छायाचित्रांना मिळालेली आहेत. ही सर्व पारितोषिक प्राप्त छायाचित्रे, बैलगाड्यांची शर्यत, आयफेल टॉवरचा अद्वितीय अँगल, नायगारा धबधबा, ट्युलिप फ्लॉवर्सची मनमोहक छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *