राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते धन्वंतरी सभागृहात रविवारी (ता. १६) वितरण
पुणे: वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. येत्या रविवारी (ता. १६) सायंकाळी ५ वाजता धन्वंतरी सभागृह, एरंडवणे पुणे येथे राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त वैद्य विनायक खडीवाले यांनी दिली.
वैद्य विनायक खडीवाले म्हणाले, “सोलापूर येथील वैद्य प्रशांत बागेवाडीकर यांना ‘महर्षि अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन बागेवाडीकर यांना गौरवण्यात येणार आहे. यासह वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल चरक पुरस्कार पुण्यातील वैद्य गुणवंत येवला, वैद्य द. वा. शेंडे रसौषधी पुरस्कार पुण्यातील वैद्या विशाखा बाक्रे, वैद्य वि. म. गोगटे वनौषधी पुरस्कार नाशिकच्या वैद्या अर्चना भास्करवार, वैद्य आचार्य यादवजी त्रिकमजी ग्रंथ पुरस्कार सांगलीतील वैद्य अनिरुध्द कुलकर्णी व वैद्या अमृता जोशी, वैद्य बाळशास्त्री लावगनकर पंचकर्म पुरस्कार नागपूरच्या वैद्य सचिन चंडालिया, वैद्य बापूराव पटवर्धन सुश्रुत पुरस्कार वर्ध्यातील वैद्या शितल आसुटकर, वैद्य भा. गो. घाणेकर अध्यापन पुरस्कार गोव्यातील वैद्या अरुणा बाले, वैद्य मा. वा. कोल्हटकर संशोधन पुरस्कार मुंबईतील वैद्या कल्पना धुरी, वैद्या लक्ष्मीबाई बोरवणकर स्त्री वैद्या पुरस्कार पुण्यातील वैद्या हेमलता जळगावकर, वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे कार्यकर्ता पुरस्कार पुण्यातील वैद्य मनिष जोशी, पूज्य पादाचार्य रचनात्मक कार्य पुरस्कार पुण्यातील वैद्य जय ताम्हाणे व डॉ. वा. द.वर्तक वनमित्र पुरस्कार रघुनाथ ढोले यांना प्रदान करण्यात येणार आहे. २१ हजार रोख रक्कम व मानपत्र देऊन या वैद्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.”