महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अशोक देडे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अशोक देडे

पुणे: पुणे येथे दर्पण दिनानिमित्त झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अशोक देडे यांची नियुक्ती करण्यात आली. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, ‘एबीपी माझा’च्या संपादिका सरिता कौशिक, मावळते प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वास आरोटे, इलेक्ट्राँनिक मीडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव आदींच्या प्रमुख उपस्थिती ही निवड करण्यात आली.

यावेळी नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून गोविंद वाकडे यांची निवड करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष मुंडे यांचा कार्यकाळ संपल्याने वाकडे यांची निवड करण्यात आली. राज्यात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या आणि पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमी अग्रेसर असणारा संघ म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची ओळख आहे. तसेच संघाकडून पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवून बातमीच्या बदलत्या प्रवाहा विषयी कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाते. पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा, हेल्मेट सुविधाही पुरवल्या जातात. सदर संघ महाराष्टाबरोबर गुजरात, गोवा आणि दिल्ली प्रदेशातही विस्ताराला असून, त्या राज्यात जिल्हा शाखाही कार्यरत आहेत. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी प्रदेशाध्यक्ष म्हणून राजू परुळेकर, राजा माने, गोविंद घोळवे, गणेश जोशी आदी पत्रकारांनी आपल्या कार्याची उत्कृष्टपणे धुरा सांभाळी आहे.

अशोक देडे गत १७ वर्षांपासून लातूरचे जिल्हाध्यक्ष असून, त्यांनी जिल्हा, मराठवाडा आणि राज्यस्तरीय उपक्रम राबवून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवण्याबरोबरच उत्कृष्ट संघटक म्हणून आपली राज्यभरात ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे राज्यकार्यकारिणीने त्यांची राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *