गडनदी होणार गाळमुक्त; माखजन येथे गाळ काढण्यास सुरुवात

गडनदी होणार गाळमुक्त; माखजन येथे गाळ काढण्यास सुरुवात

माखजन: संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील गडनदी पात्रातील गाळ उपशाला प्रारंभ झाला आहे. माखजन बाजारपेठेत वारंवार भरणाऱ्या पुराच्या पाण्याने व्यापारी व रहिवासी प्रचंड त्रस्त झाले होते.गडनदी पात्रातील व बाजूला ओढ्यांमधील गाळ काढण्यात यावा,अशी गेली अनेक वर्षांपासून व्यापारी तसेच ग्रामस्थांकडून मागणी होत होती. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी जिल्हा वार्षिक नियोजनमधुन इंधनासाठी १३ लाख रूपये मंजूर करून आणले शिवाय गडनदीच्या बाजुला बाजाराकडे असलेल्या ओढ्याला संरक्षक भिंतीसाठी पतन योजनेतून १ कोटी रूपये एवढा निधी मंजूर करून घेतला आहे. याबद्दल आमदार शेखर निकम यांचे आभार मानले जात आहे.तसेच उपस्थित व्यापारी महेश बाष्टे ( सरपंच), रूपेश गोताड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष,अजिज आलेकर, जयंत धामणकर, शकील म्हाते,श्रीकांत वर्तक,गजानन पवार, राकेश बाष्टे,शैलेश चव्हाण, रोहित रजपूत, संतोष सावर्डेकर,बावा अली, प्रथमेश कवळकर, इकलाख खोत, विनय धामणकर, प्रफुल्ल कोकाटे, प्रमोद चव्हाण, सुर्यकांत कोकाटे,आसिफ खोत व जलसंपदा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सध्या माखजन बाजारपेठेनजीक गडनदी पात्रात गाळ काढणाच्या कामाला गती आली आहे. याठिकाणी जलसंपदा विभागातील मशिनरी कार्यरत आहे.गडनदीचा गाळ उसपत असल्याने बाजारपेठेत वारंवार भरणाऱ्या पाण्याचा फटका भविष्यात कमी बसण्याची शक्यता आहे. गाळ उपशाची कारवाई तत्काळ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *