चिपळूण: स्वामी मठ ते रामेश्वर मंदिर हा बहुचर्चित रोड बाबत आमदार शेखर निकम हे स्वतः याबाबत आग्रही होते. याचे कारण पवन तलाव हे जिल्ह्यतील नावाजलेले स्टेडियम व्हावे या हेतूने येथे काम चालू होते. या स्टेडियम ला लागूनच हा महत्वाचा रोड व मुरादपुर पेठमापला जोडणारा पूल व आजूबाजूची लोक वस्ती शहरातील अतिशय महत्वाचा पर्यायी रोड म्हणून यां दृष्टीने हा चांगला रोड बनावा, यासाठी आमदार स्वतः आग्रही होते. या स्टेडियम काम चालू असताना हा रोड खराब होऊ नये व नंतर हा उत्तम दर्जा चां रोड बनावा या करीता या रोड करिता ठोक निधी मधून या रोड करिता आवश्यक निधी मंजूर करून काम मंजूर सुध्दा झाले आहे.
याच बरोबर हे काम पूर्णत्वास होण्या साठी सर्व शासकीय कागदपत्राची पूर्तता होऊन तसेच टेक्निकल सेक्शन व प्रशासकीय मान्यता देखील झाली आहे दरम्यानचे काळात आचार संहिता लागू झाल्या मुळे याची टेंडर प्रक्रिया होणे बाकी होती. आता लवकरच या रोड ची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन दोन ते तीन महिन्यात यां रोड चे काम पूर्ण होऊन ऐक उत्तम दर्जाचा रोड नागरिकांना वापरण्यास मिळणार आहे व याभागाचे वैभव वाढणार आहे. या रोड बाबत येथील स्थानीक नागरिक प्रतिष्ठित लोक प्रतिनिधी व पदाधिकारी यांनी आमदार शेखर निकम यांच्या कडे याबाबत पाठपुरावा केला होता व आमदार यांनी याबाबत विशेष लक्ष केंद्रित करून यां रोड ला निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल स्थानीक नागरिक यांनी समाधान व्यक्त केले.