संगमेश्वर : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात निवडणुकीला जोर धरला आहे. आमदार शेखर निकम यांचे आपल्या मतदार संघावर असलेले प्रभुत्व व जनतेचे त्यांचेवर असलेले प्रेम व विश्वास यांमुळे त्याचा एकतर्फी विजय निश्चित दिसत आहे. खोटी आश्वासने, पैशाचे वाटप व आमदार शेखर निकम यांच्याबद्दल अपप्रचार करून विरोधक आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करित आहेत. धामापूर जिल्हा परिषद गटातील आरवली येथे रात्री ११.३० च्या सुमारास MH 08 Z 8788 हि निषिकांत भोजने या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर असलेली कारसह काही व्यक्ती नागरिकांना जबरदस्तीने पैसे वाटप करित असल्याचे तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारायच्या आधी सदर वाहनातील एक व्यक्ती पैसे सदृष्य बागेसह MH 08 Z 8788 या गाडीमध्ये बसून संगमेश्वरच्या दिशेने व निषिकांत भोजने यांच्या नावे असलेली गाडी चिपळूणच्या दिशेने पलायन केले. ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती तात्काळ आमदार शेखर निकम यांचे स्विय सहाय्यक अमित सुर्वे यांना दिली.
अमित सुर्वे यांनी सदर घटनेची दखल घेत MH 08 Z 8788 या गाडीचा पाटलाग केला. सदर गाडी दत्ताराम लिंगायत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष हे रहात असलेल्या धामणी येथील घरात जाऊन थांबल्याने त्यांनी त्याबद्दल त्यांना विचारणा केली असता तेथे आधीच उपस्थित असलेल्या जितेंद्र चव्हाण या व्यक्तीने त्यांना हुल्लड उत्तर देत दमदाटी करून शिवीगाळ केली. अमित सुर्वे यांनी परिस्थितीचे भान राखून तेथून निघून गेले. पुढे तुरळ येथे आले असता त्यांना तांबेडी येथील सिद्धेश ब्रीद व स्थानिक रहिवासी राजेंद्र सुर्वे हे भेटले. झालेली घटना ते त्यांना सांगत असताना तेथे जितेंद्र चव्हाण आले व त्यांनी आमदार शेखर निकम यांच्याबद्दल खालच्या भाषेत वक्तव्य करित तो निवडून कसा येतो अशी धमकी दिली. सदर कृत्याबद्दल सिद्धेश ब्रीद यांनी त्यांना विचारणा केल्यावर त्यांना शिवीगाळ करून त्यांचेवर हात उचलला.
विरोधकांना आपला पराभव दिसत असल्याने त्यांच्या समर्थकांकडून मतदार संघात नागरिकांना पैशाचे सुरु असलेले वाटप किती योग्य आहे? एकीकडे विकासाच्या वलगना करून विरोधक सरड्यापेक्षाही अधिक रंग बदलून जनतेची दिशाभूल करित आहे. त्यांच्या ह्या दिखावटी करभाराला व पैशाचे मुक्त संचार वाटपाला जनताच आता मतदानातून उत्तर देईल.