चिपळूण शहराला पूर मुक्त केल्याशिवाय शांत बसणार नाही – आ. शेखर निकम
गाळ काढण्याकरिता 5 कोटी निधी पुन्हा मंजूर
चिपळूण: चिपळूण शहरातील वाशिष्टी नदीपात्रामधील टप्पा क्रमांक एक मधील उर्वरित गाळ काढणे (भाग एक) या कामाच्या प्रस्तावास सुमारे पाच कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. आमदार शेखर निकम यांनी वेळोवेळी पाठ पुरवठा करून चिपळूण बचाव समिती व जलसंपदा विभाग यांच्या सहकार्याने शासन दरबारी वेळोवेळी पाठ पुरवठा करून महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ज्यांचे चिपळूण शहरावर विशेष लक्ष आहे असे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार तसेच पालकमंत्री उदय सामंत या सर्वांचे चिपळूण शहरवासीयांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वेळोवेळी सहकार्य करणारे कार्यकारी संचालक कृष्णा खोरे महामंडळ श्री अतुल कपोले, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग कोकण श्री मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता जलसंपदा विभाग रत्नागिरी श्री सुर्वे, कार्यकारी अभियंता श्री गणेश सलगर या सर्वांचे सुद्धा शहरवासियांच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत.

 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                