‘रिपाइं’च्या वतीने ६०० पूरग्रस्तांना शिधावाटप

‘रिपाइं’च्या वतीने ६०० पूरग्रस्तांना शिधावाटप

‘रिपाइं’च्या वतीने ६०० पूरग्रस्तांना शिधावाटप
 
पुणे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराच्या वतीने पूरग्रस्तांना शिधावाटप करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेकडो कुटुंबाचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी ‘रिपाइं’ पुणे शहराच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. पक्षाच्या कार्यालयात शेकडो कुटुंबांना ही मदत सुपूर्त करण्यात आली.
 
ताडीवाला रोड, शांतीनगर, येरवडा, बोपोडी, दापोडी, खडकी परिसरातील जवळपास ६०० पूरग्रस्त कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले. यामध्ये पाच किलो गहु, दोन किलो तांदूळ, साखर, शेंगदाणे, मुग डाळ, पोहे एक किलो, मसाला, मीठ, हळद, फरसाण, गोडेतेल आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
यावेळी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, शहर सरचिटणीस शाम सदाफुले, माजी अध्यक्ष अशोक कांबळे, महिला आघाडीच्या संघमित्रा गायकवाड, शिवाजी उजगरे, पिंटू बोकेफोडे, बाबा सोनवणे, गौतम चौधरी, मीनाताई गाल्टे, मंगल राजगे, संजय बनसोडे, सुदामती चौधरी, रवी अवसरमल आदी उपस्थित होते.
 
बाळासाहेब जानराव म्हणाले, “पूरग्रस्त बांधवाना काहीसा दिलासा देण्यासाठी हे शिधावाटप केले जात आहे. या कुटुंबांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीने करत आहोत. शासकीय मदत मिळवून देण्यासाठी नुकतेच पक्षाचे मोर्चा काढला होता. त्याला प्रतिसाद म्हणून शासनाकडून १० हजार रुपयांचा धनादेश पूरग्रस्तांना दिला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *