शरद पवार यांच्या हस्ते सीए (डॉ.) एस. बी. झावरे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’

शरद पवार यांच्या हस्ते सीए (डॉ.) एस. बी. झावरे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’

पुणे : देशाचे माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते खासदार पद्मभूषण शरद पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ सनदी लेखापाल डॉ. एस. बी. झावरे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सनदी लेखापाल म्हणून तसेच शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ भरीव योगदान दिल्याबद्दल सीए (डॉ.) एस. बी. झावरे यांना सन्मानित करण्यात आले. शरद पवार यांनी मुक्तकंठाने झावरे यांच्या कार्याचे कौतुक केले.
 
सीए (डॉ.) एस. बी. झावरे गौरव समितीच्या वतीने बुधवारी (दि. १७) मोदी बागेतील शरद पवार यांच्या निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रमात पवार यांच्या हस्ते झावरे यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. प्रसंगी गौरव समितीचे उपाध्यक्ष सीए धनंजय जोशी, सचिव सीए यशवंत कासार, खजिनदार सीए अभिषेक धामणे यांच्यासह ऍड. अविनाश आव्हाड, डॉ. एम. एस. जाधव, सीए सर्वेश जोशी, सीए जी. एस. थोरात, सीए काशिनाथ पाठारे, सीए किसन गारगोटे, सीए सुहास गार्दी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
सीए (डॉ.) एस. बी. झावरे यांच्या यशस्वी कारकिर्दीला ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. सनदी लेखापाल म्हणून, तसेच सामाजिक, व्यावसायिक व शिक्षण क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. देशविदेशात उच्च पदांवर कार्यरत असलेल्या १० हजार पेक्षा अधिक सनदी लेखापालांचे गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. अत्यंत कठीण पार्श्वभूमी असतानाही बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी सीए होत शिक्षण प्रसाराचे व्रत पुढे नेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी सीए बनण्याचे स्वप्न घेऊन त्यांच्या मार्गदर्शनासाठी पुण्यात येतात. सीए करणाऱ्या अनेकांसाठी ते आधारस्तंभ आहेत. आजवर झावरे यांच्या मार्गदर्शनात १० हजारांहून अधिक सनदी लेखापाल घडले आहेत. 
 
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाचे (आयसीएआय) सेंट्रल कौन्सिल मेंबर म्हणून नेक पातळ्यांवर झावरे यांनी सीए प्रोफेशनसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेदेशविदेशातील अनेक सीए संबंधित संस्थांवर त्यांनी विविध भूषवली आहेत. एशियन ओसिएनिएन स्टॅंडर्ड सेटर्स ग्रुपचे (एओएसएसजी) उपाध्यक्ष, अध्यक्ष, ‘आयसीएआय’च्या अकौंटिंग स्टॅंडर्ड बोर्डचे (एएसबी) अध्यक्ष, नॅशनल ऍडव्हायझरी कमिटी ऑन अकाउंटिंग स्टॅंडर्डचे विशेष निमंत्रित आदी पदांवर त्यांनी काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *