‘टेकफेस्ट’मुळे विद्यार्थ्यांतील तांत्रिक कौशल्य, कलागुणांना वाव

‘टेकफेस्ट’मुळे विद्यार्थ्यांतील तांत्रिक कौशल्य, कलागुणांना वाव

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; ‘सूर्यदत्त’मध्ये दोन दिवसीय ‘टेकफेस्ट-२०२४’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटच्या एमसीए विभागातर्फे आयोजित टेकफेस्ट-२०२४ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत प्रगत तंत्रज्ञान, नवोन्मेषाचे दर्शन घडले. सामाजिक सुधारणेसाठी प्रगत तंत्रज्ञान आणि नवकल्पना या विषयावरील विविध कार्यक्रमांचे या दोन दिवसीय परिषदेत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वेळेचे व्यवस्थापन, योग्य संगणन साधने आणि त्याचे ऍप्लिकेशन यांसारख्या महत्त्वाच्या व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रांवर विचारमंथन झाले.

‘टेकफेस्ट’मध्ये ‘मिस्टर अँड मिसेस टेक्नोक्रॅट’, ‘माईंड स्वीपर’, ‘बॅटल विथ कोड’ आणि ‘गेम ग्लायडर’ या प्रमुख चार कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तांत्रिक, तार्किक आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्नोत्तरे, पाठ्यक्रम व अवांतर स्वरूपाची प्रश्नमंजुषा स्पर्धा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्पर्धा, दैनंदिन जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी इनोव्हेशन आदी गोष्टींचा यामध्ये समावेश होता. पुण्यातील विविध शिक्षण संस्थांतील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी टेकफेस्टमध्ये सहभाग घेतला.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या ‘टेकफेस्ट’चे उद्घाटन सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या संचालक प्रा. डॉ. मनीषा कुंभार यांच्या हस्ते झाले. प्रसंगी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, निमंत्रित पाहुणे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी झालेल्या स्पर्धांतून विद्यार्थ्यांमधील प्रोग्रामिंग स्किल्सचे मूल्यांकन झाले. शिक्षक, विद्यार्थी यांच्यातील समन्वय आणि व्यवस्थापनाचा पाठिंबा, त्यातून झालेले सूक्ष्म नियोजन आणि कठोर परिश्रम यातून ‘टेकफेस्ट’ यशस्वी झाले. यामध्ये झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाचे संयोजन संबंधित विभागातील तज्ज्ञ प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या टीमने केले. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे समूह संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. भविष्यातील शिक्षण क्षेत्रात अंतर्भूत होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमतेविषयी त्यांनी त्यांचा दृष्टीकोन व महत्वपूर्ण आयाम सांगितले.

क्लेव्हर ग्राउंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ पाथरे, मुख्य कार्यपालन अधिकारी स्वप्नील दाभोलकर, अमित श्रीवास्तव आणि डॉ. रजनीश मिश्रा यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिगत तसेच सांघिक बक्षीस देण्यात आले. रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते. डॉ. विद्या गवेकर आणि प्रा. मेघा माने यांच्यासह एमसीए विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या टीमने परिषदेच्या यशस्वी संयोजनात योगदान दिले.
—————————–
विद्यार्थ्यांमधील तांत्रिक कौशल्य विकसित व्हावीत, प्रगत तंत्रज्ञान, नवकल्पना निर्मितीसाठी चालना मिळावी, याकरिता सूर्यदत्त संस्थेत सातत्याने विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे आयोजन केले जाते. ‘टेकफेस्ट’मुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानातील प्रवाह समजून घेता आले. अनेकांनी नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांच्यातील नवोन्मेषाचा दृष्टीकोन प्रगल्भ होत जातो. ‘सूर्यदत्त’मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देतानाच त्यांच्यातील कलागुणांना, कौशल्याना वाव देण्यावर भर दिला जातो.
– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *