पुणे : भवानी प्रतिष्ठानने नारायण पेठेतील कबीर बाग मठ संस्थेत आयोजिलेल्या रक्तदान शिबिरात १४४ जणांनी रक्तदान केले. तसेच २५० महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. युवा सामाजिक कार्यकर्ते योगेश शांडिल्य-तिवारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व महिलांकरीता मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.
विज्ञान कितीही पुढे गेले असले, तरी रक्ताला आजवर पर्याय नाहीच, ते कोणत्याही कारखान्यात किंवा लॅबमध्ये तयार होऊ शकत नाही. तुम्ही केलेले रक्तदानच गरजूंना आयुष्य देऊ शकते. एखाद्या कुटुंबाला निराधार होण्यापासुन वाचवु शकते. तरी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन भवानी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. विशाल सुगंधी, गणेश जाधव, डॉ. मिलिंद राऊळ, निखिल देशपांडे, मधूर गेहलोत, पूजा सांकला, आदित्य कुलकर्णी, रोहन पाटील, प्रणिता गेहलोत, आदित्य साने, अथर्व लाटे, रितेश शांडिल्य आदींनी शिबीराचे संयोजन केले.