परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार ‘ई-बाईक’ देण्यासाठी डायनॅमो इलेक्ट्रिक प्रयत्नशील

परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार ‘ई-बाईक’ देण्यासाठी डायनॅमो इलेक्ट्रिक प्रयत्नशील

आकाश गुप्ता यांची माहिती; ‘डायनॅमो’तर्फे ईव्ही एक्स्पोमध्ये ११ ई-बाईक सादर
 

पिंपरी : “अलीकडच्या काळात भारत ईव्ही तंत्रज्ञानाकडे वळत आहे. २०३० पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक प्रवासाची भारताची आकांक्षा आहे. देशाच्या या महत्वाकांक्षी परिवर्तनात योगदान देण्यासाठी डायनॅमो इलेक्ट्रिकने पुढाकार घेतला असून, सर्वसामान्य व मध्यमवर्गीय ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार इलेक्ट्रिक दुचाकी उपलब्ध करून देण्यासाठी डायनॅमो इलेक्ट्रिक प्रयत्नशील आहे,” अशी माहिती डायनॅमो इलेक्ट्रिकचे संचालक आकाश गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 
पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित भारतातील पाचव्या सर्वात मोठ्या बीटूबी ईव्ही ऑटो एक्स्पोमध्ये डायनॅमो इलेक्ट्रिकच्या वतीने बाईकची नवीन रेंज सादर करण्यात आली. ५० हजार ते एक लाखाच्या किमतीत उपलब्ध होणारी ११ मॉडेल्स ग्राहकांना प्रमाणीकरण करण्यासाठी उपलब्ध करण्यात आली. यावेळी आकाश गुप्ता व पारिजात गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच या बाईकच्या वैशिष्ट्यांविषयी सविस्तर माहिती दिली.
आकाश गुप्ता म्हणाले, “डायनॅमो इलेक्ट्रिकच्या ई-बाईक रेंजमध्ये लक्झरी कलर मॉडेल्स, ब्लूटूथ स्पीकर, अँटी थेफ्ट अलार्म, यूएसबी चार्जिंग पोर्ट, सेंट्रल लॉकिंग सिस्टम आणि बॅटरी फायर आणि वॉटर प्रूफ यांसारखी ठळक वैशिष्ट्ये आहेत. ही उत्पादन श्रेणी स्वयंनिर्मित असून, याची क्षमता उच्च दर्जाची आहे. पारंपारिक लीड ऍसिड बॅटर्‍यांपेक्षा लीड ग्राफीन बॅटऱ्यांचा वापर या गाड्यांमध्ये करण्यात आला आहे. डायनॅमो इलेक्ट्रिकमध्ये ग्राफिन आणि लिथियम-आयन बॅटरी समाविष्ट असून, ती फायर प्रूफ आणि वॉटर प्रूफ तंत्रज्ञानाने सज्ज आहे.”
 

“ही सर्व उत्पादने हाय-स्पीड आणि बहुउद्देशीय दुचाकींची मागणी पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. ऑटोमोटिव्ह क्षेत्रात क्रांती करण्याचा आमचा मानस आहे. ऊर्जा कार्यक्षमता, टिकाऊपणा, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून भारतीय गतिशीलतेचे भविष्य घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यावर, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यावर आम्ही विश्वास ठेवतो,” असेही आकाश गुप्ता म्हणाले. 

पारिजात गुप्ता म्हणाल्या, “डायनॅमो इलेक्ट्रिकची सर्व उत्पादने दिल्ली आणि मुंबई येथील युनिटमध्ये तयार केली जातात. शाश्वत पर्यावरणाच्या दिशेने प्रवास करण्याच्या उद्देशाने २०२१ मध्ये ही स्टार्टअप कंपनी सुरु झाली. आज डायनॅमो इलेक्ट्रिकचे १८० पेक्षा अधिक डीलर्स आणि वितरक असून, संपूर्ण भारतात कार्य सुरु आहे. डीलर, सेवा आणि चार्जिंग नेटवर्क विकसित करण्यासाठी डायनॅमो काम करत आहे.”

 
‘डायनॅमो’ची वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल्स
हाय-स्पीड आरटीओ नोंदणीकृत मॉडेल्समध्ये आरएक्स-१ आणि आरएक्स-४ याचा समावेश असून, याची कमाल गती ६५ किलोमीटर प्रति तास इतकी आहे. २ ते ३ केव्ही क्षमता असलेल्या बॅटरीला १६५ ते १८० किलोमीटरचे मायलेज मिळते. कमी-स्पीड मॉडेल्सच्या श्रेणीमध्ये अल्फा, स्माइली, इन्फिनिटी आणि व्हीएक्स-१ यांचा समावेश आहे. सुरळीत हालचाल करण्यासाठी टायरचा आकार १० आणि १२ इंच आहे. या गाड्यांची किंमत ५५ हजारांपासून सुरु होते. एक लाखापर्यंत टॉप मॉडेल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *