बाल आरोग्य व विकासावर सोमवारी विचारमंथन

बाल आरोग्य व विकासावर सोमवारी विचारमंथन

युनिसेफ व ग्रॅव्हिटस फाउंडेशनचा संयुक्त पुढाकार

पुणे : युनिसेफग्रॅव्हिटस फाउंडेशनतर्फे ‘बालकल्याण, आरोग्य व त्यांचे अधिकार’ या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे (राउंड टेबल कॉन्फरन्स-Round Table Conference) आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी (दि. १९ जून) दुपारी १.३० ते सायंकाळी ४ या वेळेत हॉटेल रामी ग्रँड, आपटे रस्ता, पुणे येथे ही राउंड टेबल कॉन्फरन्स होणार आहे, अशी माहिती ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांनी दिली.

उषा काकडे म्हणाल्या, “युनिसेफच्या सहकार्याने बालकांच्या संदर्भातील प्रश्नांवर राज्यस्तरीय परिषद घेण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. बालहक्कांबद्दल जागरूकता निर्माण करून आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने ही परिषद महत्वाची आहे. या परिषदेत बाल आरोग्य व विकास (Child Health & Development), बालकांची लेखन-वाचन क्षमता (Every Child Reading) आणि पाणी व्यवस्थापनात युवकांचा सहभाग आदी विषयांवर चर्चा होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व युनिसेफच्या महाराष्ट्र विभाग प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर (Rajeshwari Chandrashekhar) यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता उद्घाटन सत्र होणार आहे.”

या परिषदेत सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या (Symbiosis International University) प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure),  दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan), भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. मेधा कुलकर्णी (Dr. Medha Kulkarni), कायद्याच्या अभ्यासक ऍड. दिव्या चव्हाण, इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association) महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, बालनाट्य लेखक व दिग्दर्शक संजय हळदीकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमिता फडणीस (Dr. Amita Phadnis), ट्रान्सजेंडर ॲक्टीविस्ट  लक्ष्मीनारायण त्रिपाठी, राज्याच्या महिला व बालकल्याण आयुक्तालयाचे उपायुक्त राहुल मोरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता, सामाजिक कार्यकर्त्या जुगनू गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे विचार मांडणार आहेत. अनेक मान्यवर कलाकार, बालकांसाठी काम करणारे कार्यकर्ते आणि समाजातील प्रतिष्ठीतांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *