निसर्गाच्या सान्निध्यात ‘इको फ्रेंड्स’चा शपथग्रहण समारंभ

निसर्गाच्या सान्निध्यात ‘इको फ्रेंड्स’चा शपथग्रहण समारंभ

लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्सच्या अध्यक्षपदी

किशोर मोहोळकर, सचिवपदी रमेश पसरीजा यांची निवड

 पुणे : गौ-पूजन, पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांच्या पानांची सळसळ, वाऱ्याची येणारी झुळूक, हिरवीगार वनराई, सकाळची कोवळी सूर्यकिरणे अशा निसर्गरम्य वातावरणात स्मृतिवन वारजे येथे सकाळी ७ ते १० या वेळेत लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्सच्या नव्या कार्यकारिणीचा शपथग्रहण समारंभ अनोख्या पद्धतीने पार पडला. प्रमुख पाहुणे व शपथग्रहण अधिकारी लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित यांच्या मधुर आवाजातील संगीतमय भाषणाने हा समारंभ आकर्षक झाला.

लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्सच्या अध्यक्षपदी किशोर मोहोळकर, उपाध्यक्षपदी पल्लवी लामदाडे, सचिवपदी रमेश पसरीजा, खजिनदारपदी संदेश सरडे, जनसंपर्क अधिकारी म्हणून विश्वास सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष मयूर बागुल यांच्याकडून मोहोळकर यांनी पदभार स्वीकारला. लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित यांनी शपथग्रहण अधिकारी म्हणून सर्वांना जबाबदारी, तसेच पदाची शपथ दिली. क्लबचे मार्गदर्शक अनिल मंद्रुपकर उपस्थित होते.

शहराच्या विविध भागात वृक्षारोपण प्रकल्प, रामनदीचे संवर्धन, वारजे वन उद्यानात एक एकर जागेत वृक्ष लागवड व संवर्धन, मुठा नदीतील रांजणखळग्यांचे जतन व प्रसार, गडकिल्ल्यांचे संवर्धन, धार्मिक स्थळांची स्वच्छता, कचरा वर्गीकरण, वाहतूक जनजागृती, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, प्लास्टिक मुक्ती, पर्यावरण संरक्षणासाठी शालेय मुलांकरिता कार्यशाळा असे अनेक उपक्रम येत्या वर्षभरात राबविण्यात येणार असल्याचे किशोर मोहोळकर यांनी नमूद केले.
 
२०२३-२४ या वर्षाकरिता निवडण्यात आलेल्या या कार्यकारिणीमध्ये अंजली कुलकर्णी (सहसचिव), गिरीश पाटील (सहखजिनदार), अनिल मंद्रुपकर, शिवानंद लामदाडे, सुहास कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, सुनीता मंद्रुपकर, सौरभ मोहोळकर, शंतनू पेंढारकर, वामन भालेराव, अरुंधती कुलकर्णी, रवींद्र चनाळे, अनिता पाटील, राणी पसरीजा, कल्पना भालेराव, अरुण कुलकर्णी, दीपक धोंडे यांचा समावेश आहे.
 
जगदीश पुरोहित म्हणाले, “आपल्यातील दयाळूपणा समाजातील वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत असतो. निसर्ग संवर्धनाच्या कार्याला वाहून घेतलेल्या या क्लबने माणूस आणि निसर्ग या दोहोंप्रती प्रेमभाव जोपासला आहे. भविष्यात समाज आणि निसर्गाला प्रफुल्लित ठेवण्याचे काम व्हावे. मोठ्या हॉटेलात किंवा सभागृहाऐवजी निसर्गात शपथग्रहण समारंभ आयोजित करण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे.”
 
अनिल मंद्रुपकर यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास सूर्यवंशी यांनी आभार मानले.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *