रोलबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत  ‘सूर्यदत्त’च्या मनीष राठोडला सुवर्णपदक

रोलबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत ‘सूर्यदत्त’च्या मनीष राठोडला सुवर्णपदक

रोलबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत
‘सूर्यदत्त’च्या मनीष राठोडला सुवर्णपदक
 
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेकनॉलॉजीच्या एमसीएच्या पहिल्या वर्षातील
विद्यार्थी मनीष राठोड ऑल इंडिया युनिव्हर्सिटी रोलबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक विजेता
पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेकनॉलॉजीमध्ये ‘एमसीए’च्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मनीष राठोडने ऑल इंडिया युनिव्हर्सिटी रोलबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रोलबॉल संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले. कर्नाटकातील बेंगळुरूच्या उत्तर विद्यापीठात १७ ते २० मे २०२३ या कालावधीत ही स्पर्धा झाली. रोलबॉल हा भारतातील स्वदेशी खेळांपैकी एक आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि राष्ट्रातील तरुण नियमितपणे खेळतात. हा खेळ अतिशय रोमांचक असल्यामुळे खेळणाऱ्या, तसेच खेळ पाहणाऱ्या प्रत्येकाला तो आवडतो.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी मनीष राठोडचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “सूर्यदत्तकडून नेहमीच खेळाला व तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यात येते. विद्यार्थी स्वयंप्रेरणेने, तसेच संस्थेच्या प्रेरणेने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. सूर्यदत्त स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडेमीच्या वतीने  क्रीडा समन्वयक सुखविंदर कौर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना खेळातील सहभागासाठी प्रेरित केले जाते. राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ खेळाडूंच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जाते. ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत यश मिळवावे, या उद्देशाने आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन करण्यावर भर दिला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *