अतिरिक्त आयुक्त धनंजय आखाडे यांचे मत; ‘आयसीएआय’तर्फे ‘जीएसटी’वरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे : “वस्तू व सेवा कर (जीएसटी) मसुदा तयार केल्यानंतर त्यामध्ये विविध महत्वाच्या सूचना, बदल सांगण्यापासून ते ‘जीएसटी’ यशस्वीपणे संकलन करण्यात सनदी लेखापाल महत्वाची भूमिका बजावत आहे. ‘आयसीएआय’च्या सक्रिय सहभागाने ‘जीएसटी’मध्ये सुसूत्रता येत आहे. ‘जीएसटी’ची प्रभावी अंमलबजावणी होण्यात सनदी लेखापालांचे मोलाचे योगदान आहे,” असे मत राज्याच्या जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय आखाडे यांनी व्यक्त केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) जीएसटी व इन्डायरेक्ट टॅक्सेस कमिटी आणि आयसीएआय पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जीएसटी’वरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आखाडे यांच्या हस्ते झाले. ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात ही दोन दिवसांची परिषद होत आहे. ‘उद्धारणम – शेअरिंग नॉलेज’ अशी या परिषदेची संकल्पना आहे. ५५० पेक्षा अधिक सनदी लेखापाल या परिषदेत सहभागी झाले होते.
प्रसंगी ‘आयसीएआय’च्या जीएसटी कमिटीचे चेअरमन सीए राजेंद्र कुमार, व्हाईस चेअरमन सीए उमेश शर्मा, विभागीय समितीच्या सदस्य सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे, उपाध्यक्ष सीए राजेश अगरवाल, सचिव सीए प्रितेश मुनोत, खजिनदार सीए प्रणव आपटे, ‘विकासा’च्या चेअरपर्सन सीए मौसमी शहा, परिषदेचे समन्वयक सीए अजिंक्य रणदिवे, सदस्य सीए अमृता कुलकर्णी, सीए सचिन मिनियार, सीए ऋषिकेश बडवे आदी उपस्थित होते.
धनंजय आखाडे म्हणाले, “देशात २०१७ मध्ये जीएसटी लागु केल्यापासून आजवर पाच वर्षांत त्यामध्ये अनेक बदल झाले. सर्वाधिक बदल ‘आयसीएआय’ने सूचवले आहेत. सरकार म्हणून आम्ही ‘जीएसटी’मधील त्रूटी दुर करण्याचे काम केले आहे. भारताला आर्थिकदृष्टया स्पर्धात्मक तसेच पारदर्शक बनवण्यात जीएसटीचा माेलाचा वाटा आहे. जीएसटीच्या रूपाने एक परिणामकारक कर प्रणाली राबवण्यात आली आहे. त्यात ‘आयसीएआय’चा सक्रिय सहभाग आहे.”
सीए राजेंद्र कुमार, सीए उमेश शर्मा यांनीही मनोगते व्यक्त केली. सीए काशिनाथ पाठारे यांनी स्वागत-प्रास्ताविकात परिषदेचे महत्व विषद केले. सीए सायली चंदालिया यांनी सूत्रसंचालन केले. सीए प्रितेश मुनोत यांनी आभार मानले.