नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व ‘हॅप्पीमोंगो लर्निंग’ यांच्यात सामंजस्य करार

नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व ‘हॅप्पीमोंगो लर्निंग’ यांच्यात सामंजस्य करार

कृत्रिम बुद्धिमत्ता, कोडिंगसह कौशल्य विकास उपक्रमांचे होणार आयोजन

पुणे : शिक्षण क्षेत्रात कार्यरत हॅप्पीमोंगो लर्निंग सोल्यूशन्स आणि राष्ट्रीय कौशल्य विकास प्राधिकरण अर्थात नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी (एनएसडीसी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना ‘एनएसडीसी’ आयोजित कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, कोडिंग यासह अन्य कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना ‘एनएसडीसी’चे प्रमाणपत्र मिळणार आहे. भारतीय, तसेच परदेशातील विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे.
 
या भागीदारीमुळे शिक्षण क्षेत्रात हॅप्पीमोंगो आणखी दर्जेदार शिक्षण देऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करत हॅप्पीमोंगो लर्निंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिवा कार्तिकेयन म्हणाले, “नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकृत नॉलेज पार्टनर असल्याने या भागीदारीचा आम्हाला आनंद आहे. आता आमच्याकडील विद्यार्थी नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे कौशल्य विकास कार्यक्रम, अभ्यासक्रम, डिजिटल टूल्स, मोबाईल अॅप्लिकेशन्स आणि ई-चाचण्या यांचा वापर करु शकणार आहेत. तरुण विद्यार्थी आणि प्रौढ या दोघांनाही याचा अतिशय चांगला फायदा होईल. येत्या काळात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठीही काही प्रोग्रॅमची निर्मिती करु शकू अशी आशा आहे.”
 
“कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रमांना निधी देण्याच्या प्रयत्नांना या भागीदारीमुळे आणखी चालना मिळाली आहे. आम्ही ३७ केंद्रित क्षेत्रांतर्गत खाजगी गुंतवणूकदारांसाठी उच्च दर्जाची माहिती आणि कौशल्य प्रशिक्षणे देण्यास तयार आहोत. अत्यंत प्रतिष्ठित प्रशिक्षण आणि प्रमाण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना चांगल्या भविष्यासाठी मदत करताना आम्हाला हॅप्पीमोंगोसोबत केलेली भागीदारी उपयुक्त ठरणार आहे, असे ‘एनएसडीसी’च्या प्रवक्त्यांनी नमूद केले.
 
हॅप्पीमोंगो विषयी:
हॅप्पीमोंगो ही तंत्रज्ञान कंपनी असून, ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादने आणि त्यासंदर्भातील उपाययोजना तयार करते. कंपनीचा डेटा २००० हून अधिक स्वतंत्र तपासण्या आणि चाचण्यांमधून जातो.
संकेतस्थळ – http://www.happymongo.com/
मोबाईल – 9892790750
नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन विषयी:
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) ही ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. ही कंपनी वित्त मंत्रालयाने सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP)मॉडेल म्हणून स्थापन केली आहे. मोठ्या, दर्जेदार आणि फायद्याच्या व्यावसायिक संस्थांच्या निर्मितीला प्रेरीत करून कौशल्य विकासाला चालना देण्याचे संस्थेचे उद्दीष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *