पुणे : सामाजिक कार्यकर्ते गणेश घुले यांच्या वाढदिवसानिमित्त बिबेवाडी परिसरात गौरव घुले फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परिसरातील खेळाडूंचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने कृष्णाई क्रिकेट प्रीमियर लीग, नागरी सुविधा शिबिर, सुकन्या समृद्धी योजना, आधार कार्ड – पॅन कार्ड शिबीर, अवधूत गुप्ते संगीत रजनी आणि मधुसुदन ओझा प्रस्तूत राजनिगंधा स्वरमैफल, तसेच महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
लकी ड्रॉ स्पर्धेतील विजेत्यांना एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन, मिक्सर यासह सहभागी महिलांना डिनर सेट भेट देण्यात आले. परिसरातील नागरिकांना आधार कार्डला मोबाईल, ई-मेल लिंक करून देण्यासह मोफत आधार कार्ड काढून देण्यात आले. कृष्णाई क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत ७० संघानी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे बक्षीस वितरण अवधूत गुप्ते व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे, विद्याधर अनासकर, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्ता धनकवडे, भाऊसाहेब भोईर आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रिकेट स्पर्धेत जय शंकर क्रिकेट टीमने प्रथम, प्रतीक कदम संघाने द्वितीय, तर शिवप्रताप क्रिकेट क्लबने तृतीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर म्हणून विजेत्या खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले. गौरव घुले यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत खिलाडूवृत्ती जोपासण्याचे आवाहन केले.