पुणे : करोनाच्या काळात ऑनलाईन शाळा सुरु झाल्या, गेले दोन वर्षे मोबाईल, लॅपटॉप वर शाळा केल्यानंतर आता प्रत्यक्ष शाळेत जाताना मुले व पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांची ही आव्हाने सोपी करण्यासाठी ‘सुपरमाईंड’ एका अभिनव कल्पनेसह मदतीचा हात घेऊन आले आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी पुण्यातील ‘सुपरमाईंड’ संस्थेने विनामूल्य मार्गदर्शक सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अश्विनी भालेकर व अनुजा करवडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मंजुषा वैद्य व सहकारी उपस्थित होते. या सत्रास सुरुवात झाली असून सकाळी ९ ते १२ व ४ ते ७ या वेळेत विद्यार्थी व पालकांना विनामूल्य वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक, शिक्षक व समुपदेशक मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन पुण्यातील शास्त्री रस्त्यावरील नवी पेठ येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात करण्यात येईल. मार्गदर्शन मर्यादित कालावधीसाठी असल्याने इच्छुकांनी ९०४९९९२८०७/८/९ या क्रमांकावर किंवा www.supermindstudy.com या संकेतस्थळावर संपर्क साधून पूर्व नियोजित वेळ घेणे आवश्यक आहे.
यावेळी भालेकर म्हणाल्या, दोन वर्षात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान, शाळेशी, शिक्षकांशी संपर्क, संवाद नसल्याने विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर झालेले विपरीत परिणाम, लिखाणाच्या सर्वच अभाव, शिक्षणातील अभ्यासातील कमी झालेले स्वारस्य, परीक्षेची सवय नाही आदी अनेक आव्हाने आज पालक व विद्यार्थ्यांसमोर असल्याने अशा सर्व गोष्टींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यात संभाषण, वाचन, लेखन व श्रावण या कौशल्यांसह विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी ‘टिप्स’ विद्यार्थ्यांना दिल्या जातील.”
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच अभ्यासातील आव्हानांवर योग्य उपयोजन करणे तसेच शिक्षणाबाबत, अभ्यासाबाबत गांभीर्य व सजगता निर्माण कारंडे व अभ्यासातील स्वारस्य वाढवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे हेच या मार्गदर्शन सत्राचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.