सोलर कुकरच्या निर्मितीत रमले बालवैज्ञानिक

सोलर कुकरच्या निर्मितीत रमले बालवैज्ञानिक

मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘प्रयोगातून विज्ञान अंतर्गत सौर ऊर्जेवर (Solar Energy) कार्यशाळा

पुणे : दिलेल्या साहित्यातून सोलर कुकरच्या (Solar Cooker) निर्मितीत आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या सोलर कुकरमध्ये शिवजवलेले पदार्थ (Food) चाखण्यात बालवैज्ञानिक (Little Scientists) रमले. तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना मनात निर्माण झालेले कुतूहल (Excitement) विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सोलर कुकरची निर्मिती करून शमवले.
 
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, (Marathi Vidnyan Parishad) द इंन्स्टिट्युटशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) पुणे लोकल सेंटर आणि सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया (Solar Energy Society of India) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रयोगातून विज्ञान’ (Science through Experiments) या उपक्रमांतर्गत सौरऊर्जा कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उदघाटन उद्योजक श्री तांबे यांनी केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या (National Science Day) पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी सोलर कुकरची निर्मिती आणि त्यावर पदार्थ शिजवत प्रत्यक्ष प्रयोगातून सौर ऊर्जेतील विज्ञान (Science) जाणून घेतले.
 
शिवाजीनगर (Shivajinagar) येथील ‘द इंन्स्टिट्युटशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) (The Institution of Engineers) येथे झालेल्या कार्यशाळेत तज्ज्ञ विवेक काब्रा (Vivek Kabra) यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी विपिन मुनोत, विलास रबडे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ, अशोक तातुगडे, प्रा. विनय र. र., संजय मा. क. आदी उपस्थित होते. ८ वी व ९ वीचे एकूण ४० विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
 
प्रा. राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा, यासाठी मराठी विज्ञान परिषद गेली पाच दशके मराठीतून विज्ञान प्रसाराचे काम करत आहे. भविष्यात इंधनाची टंचाई भासणार असल्याने सौरऊर्जेकडे अक्षय ऊर्जेचा स्रोत म्हणून पाहिले जात आहे. विद्यार्थ्यांना सोलर कुकर बनवण्याचे साहित्य, त्यासाठीची प्रक्रिया व मार्गदर्शन देण्यात आले. हे सोलर कुकर विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिले असून, वर्षभर संशोधन करून विद्यार्थी निरीक्षणे नोंदवणार आहेत.”
 
“सोलर कुकर बनवून स्वतः त्यात अन्नपदार्थ शिजवून विद्यार्थ्यांनी हा सूर्यप्रसाद खाल्ला. सौरऊर्जा ही न संपणारी आहे. स्वतः हाताने सोलर कुकर बनवल्याने त्यांना यातील विज्ञान सहजपणे समजले. अशा प्रयोगातून विज्ञान समजून घेण्याची वृत्ती विद्यार्थी दशेतच विकसित होते,” असे विलास रबडे यांनी सांगितले. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना सौरऊर्जचे महत्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा होता. प्रयोगातून विज्ञान या उपक्रमातून शाळाशाळांतून जागृती करण्यात येत असल्याचे अशोक तातुगडे यांनी नमूद केले.
 
सौरऊर्जा भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. ते समजून घेण्यासाठी सौरकुंभ (SolarKumbh) हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. बालवयातच प्रत्येक मुलाला सौरऊर्जेचे महत्व समजले, तर त्याचा वापर करणे सहज शक्य होईल. अशा प्रयोगातून मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने सौरऊर्जेचा वापर करण्याची प्रेरणा मिळेल. प्रत्येक शाळांमध्ये सोलर कुकर निर्मिती व अन्य प्रयोग राबवले जावेत.
– विवेक काब्रा, सोलर तज्ज्ञ
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *