‘एमआयटी’च्या वतीने आयोज
पुणे: विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन,इन्क्युबेशन आणि इन्व्हेन्शनची संस्कृती वाढविण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ‘इनोव्हेशन हॅकेथॉन २०२२’ ही स्पर्धा २० ते २५ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आणि प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता केंद्र सरकारचे इनोव्हेशन डायरेक्टर डॉ. मोहित गंभीर यांच्या हस्ते होणार आहे. ही स्पर्धा द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये होणार आहे. यात ‘आयडियाथॉन’, “वर्क्याथॉन’ आणि ‘ऑक्टॅथॉन’ है तीन गट असतील. विद्याथ्र्यांनी स्वतःची कल्पना साकार करणे, त्याला मूर्तरूप देणे आणि ‘ऑक्टॅथॉन’मध्ये तासांत आठ स्पर्धकाने एखाद्या समस्येचे समाधान शोधून काढून त्याचे प्रारूप तयार करायचे आहे. या तिन्ही गटांसाठी एकूण ५०० प्रॉब्लेम्स विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. त्यासाठी ४५० मेंटॉर नियुक्त करण्यात आले आहेत. यामधील १०० ‘प्रॉब्लेम्स स्टेटमेंट्स’ हे विविध कंपन्यांकडून प्राप्त झाले आहेत. यात विविध क्षेत्रांतील ३,५०० स्पर्धक सहभागी झाले आहेत.
प्रत्येक गटातील प्रथम दोन विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी https://www. hackmitwpu.com या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. चिटणीस आणि डॉ. पांडे यांनी केले आहे.