पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नऊ संघांची निवड

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नऊ संघांची निवड

पुणे: ‘अरे आवाज कुणाचा’चा. जल्लोषात सुरु झालेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये नऊ संघ दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे दरवर्षी घेण्यात येणारी ही स्पर्धा महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. कोरोनामुळे स्पर्धेच्या परंपरेत काहीसा खंड पडला. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने संस्थेने स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला. भरत नाट्य मंदिर येथे गेल्या चौदा दिवसांपासून रंगलेल्या स्पर्धेमध्ये ५० संघ सहभागी झाले होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी सोमवारी पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये नऊ संघांची वर्णी लागली.

त्यामध्ये आयएमएमसी (वरात), कावेरी महाविद्यालय (सफर), प. भू. वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बावधान (कला?), बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (मंजम्मा पुराणम), श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय (एव्हरी नाइट इन माय ड्रीम्स), पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर (सहल), मॉर्डन महाविद्यालय, गणेशखिंड (भाग धन्नो भाग), अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (पाणीपुरी) आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय (कंप्लिट व्हॉईड) या संघांचा समावेश आहे.

स्पर्धेची अंतिम फेरी २२ व २३ जानेवारीला होणार असून, दरवर्षीप्रमाणे शेवटच्या दिवशी त्या त्या फेरीतील निकाल जाहीर होतील. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. २९ जानेवारीला होईल. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मयूरेश कुलकर्णी, विश्वास करमरकर आणि मंदार पटवर्धन यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिके

अनुष्का गोखले (उसका, एमएमसीसी), मैत्रेयी हातवळणे (हिरवीन, पीसीसीओ ई), अरुण गावडे (अस्थिकलश, मॉडर्न महाविद्यालय), तन्वी कांबळे (शोधयात्रा, कमिन्स), राज निंबाळकर (लाल, टीमवि),
अथर्व शेटे [द हंगरी, म.ए सो सीनिअर महाविद्यालय), मुकुल डेकले (घुंगरू एमएमसीसी), ऋषिकेश वनवे (झापडं, जी. एच. रायसोनी), राघव वर्तक (कधीतरी, इंडसर्च) आणि राजेश नागरगोजे (क्षुधा, टिळक आयुर्वेद महाविद्यालय)

उत्तेजनार्थ विद्यार्थी दिग्दर्शक
शुभम शहाजी घोडके (म्हातारा पाऊस, न्यू आर्टस् महाविद्यालय)

उत्तेजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शक
शांभवी जोशी (शोधयात्रा, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *