पुणे, ता. १३ : “चुकीच्या जीवनशैलीमुळे आज अनेक विषाणू आपल्यावर आक्रमण करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व युवकांना शालेय जीवनापासून आरोग्याविषयी माहिती द्यायला हवी, ” असे मत सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी नुकतेच व्यक्त केले.
सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. गंगवाल यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी चंद्रकला गंगवाल, सूर्यकांत पाठक, डॉ. रमेश अग्रवाल, गणेश घोष, सुनील जोशी, प्रभाकर कोंढाळकर, सुहास भोमे, विजय वरुडकर आदी उपस्थित होते.
यावेळी नीता मगर, अमृता जगताप यांना जिजाऊ युवा रत्न पुरस्कार आणि चेतन मराठे, सागर पाटील, अरविंद हमदापुरकर, केदार गजऋषी, स्वप्नील गंगवणे, संदेश बनसोडे, शिवाजी तायडे, शिवशंकर स्वामी यांना विवेकानंद युवा रत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी आयोजित चर्चासत्रात डॉ. मनीषा सोळंकी, डॉ. अनुप गांधी, ज्योती मुंडग आदींनी सहभाग घेतला.