पुणे : राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र पुणे विभागीय शाखेच्या वतीने अंधजनाचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीचे (४ जानेवारी) औचित्य साधत, दृष्टीहीनांसाठी मराठी व इंग्रजी ब्रेल वाचन, सुगम गायन, काव्यवाचन अश्या खुल्या गटातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
काँग्रेसभवन, शिवाजीनगर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका प्राची आल्हाट, आशिष आल्हाट, उद्योगपती महेन्द्र जाधव, प्रहार संघटनेच्या वतीने विद्या ठिपसे, पोलिस मित्र मंडळाच्या उपाध्यक्षा रूपा जाधव उपस्थित होत्या. या स्पर्धेला सर्व अंध बांधवाकडुन उत्तम प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे प्रायोजकत्व युनियन बँक आँफ इंडिया, शिवाजीनगर यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी युनियन बँक आँफ इंडियाचे पुणे पुर्वचे जनरल मॅनेजर, गुरू प्रसाद, रिता इंडिया फाऊंडेशनच्या संस्थापिका रिता शेटीया यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. रिता इंडिया फाऊंडेशनतर्फे दृष्टीहिनाना २०० सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र पुणे विभागीय शाखा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष जनार्दन कोळस, महासचिव श्री शिवाजी लोंढे तसेच कोषाध्यक्ष सुशील पाटील, कार्यकारिणी सदस्य प्रकाश नवले, संघटनेचे मानद अध्यक्ष कुलदीप रावळ, शांताराम जाधव, यशवंत वाघमारे, अंजना झोजे, संगिता पवार, राजेंद्र थोरात, सुनील सुर्यवंशी, विशाल पवळे आदी उपस्थित होते.
सुत्रसंचालन महासचिव शिवाजी लोंढे यांनी केले. आभार संघटनेचे सचिव सदानंद जन्नु यांनी मानले. अंधजनाच्या पुणे शहरातील समस्या अनेक असुन, त्या सोडविण्यासाठी सगळ्यांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले.