प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे मत; ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्र
—
हवामान बदलांचे परिणाम टाळण्यासाठी
आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक
कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे प्रतिपादन; शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्र
——
भविष्यातील धोका टाळण्यासाठी तापमानवाढ थांबवणे गरजेचे
हवामानशास्त्रज्ञ डॉ. एम. सी. वार्ष्णेय यांचे मत; ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्र
पुणे : “कृषी शिक्षण देताना पदवीधारकांना अधिकाधिक सक्षम बनविणेसाठी कृषी स्टार्टअप प्रकल्प देणे, कृषी आधारित यशस्वी उद्योगांचा त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे, नवीनवीन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणे अशा विविध बाबी अंतर्भूत करणे गरजेचे आहे. कृषी संशोधनासाठी निधी वाढविणे गरजेचे आहे. शेतकरी, त्याचबरोबरच कृषी क्षेत्रात कार्य करणारे प्राध्यापक व शास्त्रज्ञ यांना आत्मसन्मान मिळणे हे महत्वाचे आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या मुलांचा उत्साह वाढून ते शहराकडे न वळता शेती करण्यासाठी प्रवृत्त होतील. कृषी क्षेत्रात स्टार्टअप वाढावेत, यासाठी सूर्यदत्तामधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब आणि इनोव्हेशन लॅब विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उपलब्ध करून दिली जाईल,” असे प्रतिपादन सेंटर फोर एज्युकेशन, रिसर्च एन्ड ग्रोथ (सीईआरजी), नवी दिल्लीचे उपाध्यक्ष व सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केले.
कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र व ग्रामीण विकास व शिक्षण संस्था, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्रामध्ये ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. गुजरातेतील आनंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व हवामानशास्त्रज्ञ डॉ. एम. सी. वार्ष्णेय, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार, ग्रामीण विकास संस्थचे पदाधिकारी, कृषि हवामानशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. जयवंत जाधव व जलहवामान शास्त्रज्ञ डॉ. विजय स्थूल उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. चोरडिया यांचा ‘सीईजीआर’च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, तर डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचा कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, “जगभरात मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड व मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवामानात बदल होत आहेत. वाढते तापमान, दुष्काळ, वादळ, ढगफुटी,
“सूर्यदत्तामध्ये मातीशी नाते हा अभिनव उपक्रम राबविला जात असून, त्यातून लहान मुलांमध्ये शेतीविषयी आपुलकी वाढावी, शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे जीवन त्यांना समजावे, हा उद्देश आहे. भातलावणी, पर्यावरण विषयक जागृतीपर उपक्रम यामध्ये आयोजिले जातात. याशिवाय महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वोकेशनल एज्युकेशन संचालित डिप्लोमा इन ऍग्रीकल्चरल टेक्नॉलॉजी आणि डिप्लोमा इन ऍग्रिकल्चरल इंजिनिअरींग हे दोन अभ्यासक्रम, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित एमबीए इन ऍग्री बिझनेस हा अभ्यासक्रम, एआयसीटीई संलग्नित पीजीडीएम (ऍग्री बिजनेस अँड रूरल डेव्हलपमेंट) अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यामुळे सूर्यदत्ता संस्था आणि कृषी क्षेत्र यांचे एक वेगळे नाते आहे,” असेही प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.
प्रा. वार्ष्णेय म्हणाले, “वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण, वृक्षतोड, वणवा, औष्णिक विद्युत केंद्र अशा विविध कारणांमुळे वातावरणातील तापमान वाढत आहे. तापमान वाढीचा भविष्यातील धोका लक्षात घेता तापमान वाढ थांबविणेसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. बदलत्या हवामान परीस्थितीमध्ये विविध पिकांच्या मॉडेल्सवर अभ्यास होणे महत्वाचे असून त्यानुसार पिक नियोजन करणे आवश्यक आहे.”
डॉ. जाधव यांनी हवामन बदल व पीक पद्धती या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हवामान बदल म्हणजे काय, त्याचे होणारे परिणाम व शेती व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. डॉ. गोरंटीवार यांनी हवामान अद्ययावत शेती जलव्यवस्थापन याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देताना स्वयंचलीत हवामान केंद्रे, ड्रोन, रोबोटिक्स, मोबाईल ऍप, उपलब्ध साधनसामुग्रीचा काटेकोर वापर अशा विविध बाबींविषयी माहिती दिली. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ हवामान बदलासाठी करीत असलेले कार्य, क्लायमेट स्मार्ट, डिजिटल व हरित गावे यांची विद्यापीठाकडून चालू असलेली उभारणी यांचीही माहिती त्यांनी दिली. नाडगोडे यांनी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने तर डॉ. मासळकर यांनी कृषी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थितांचे व सहभागी शेतकऱ्यांचे आभार मानले.