महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत : दीपक मानकर
सुतारदऱ्यात सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला हवाले यांच्या पुढाकारातून महिला सबलीकरण भवनाचे उद्घाटन

पुणे : महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवणे, त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी तसेच महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात महिला सबलीकरण भवन उभारण्यात आले आहे. बहुजन महिला विकास सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा उज्वला मच्छिंद्र हवाले यांच्या पुढाकारातून उभारलेल्या या भावनांचे उद्घाटन माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे, राष्ट्रवादी नेत्या अर्चनाताई चंदनशिवे, माजी सभागृह नेते बंडू केमसे, पुणे जिल्हा रिपाई अध्यक्ष उमेश कांबळे, विठ्ठल गायकवाड, कांचन कुंबरे, पप्पू टेमघरे, सागर पाडळे, दुष्यन्त मोहोळ, पंचशील ग्रुपचे अध्यक्ष नागेश गायकवाड, व्यवस्थापक संजय सुतार, गणेश कदम, सुभाष गायकवाड, लाला कानगुडे, सुभाष पवार, रफिक शेख, जयश्री यादव, पुनम पाटोळे, सारिका मोहिते, वंदना हवाले, जना कोकणे, उषा सहानी, सारिका जगताप, अवंतिका सोनावणे, आशा केळगंद्रे, छाया भोसले, आरती गायकवाड, पूजा शिर्के आदी उपस्थित होते.
सुनीता वाडेकर म्हणाल्या, “महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी उज्वला हवाले यांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. शासनाच्या, तसेच महापालिकेच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत. त्या योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी या महिला सबलीकरण भवनामार्फत काम व्हावे. या योजनांचा लाभ येथील महिलांना मिळाला, तर त्या स्वयंपूर्ण होतील.” 
उज्वला हवाले म्हणाल्या, “महिलांच्या विकासासाठी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने उपक्रम राबवले जात आहेत. त्यांच्यावरील अन्यायाविरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे. भवनाच्या माध्यमातून शासकीय योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विधवा, घटस्फोटीत महिलांसाठी, कष्टकरी महिलांसाठी सातत्याने उपक्रम घेतले जातात. ज्येष्ठ नागरिक, बेरोजगार यांच्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.” 


 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                