सुर्यदत्ता ज्युनिअर कॉलेज, सुर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवले बारावी परीक्षेत घवघवीत यश

सुर्यदत्ता ज्युनिअर कॉलेज, सुर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवले बारावी परीक्षेत घवघवीत यश

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालात सुर्यदत्ता ज्युनिअर कॉलेज, सुर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. सुर्यदत्ता ज्युनिअर कॉलेज आणि सुर्यदत्ता पब्लिक स्कूल दोन्ही महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
 
सुर्यदत्ता पब्लिक स्कूलमधील विज्ञान शाखेत १५७, वाणिज्य शाखेत १३८, तर कला शाखेत ९७ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यातील १२४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, तर ३३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अमिया उदय रासकरने (९५.६७ टक्के) प्रथम, इशिता अमित चौधरीने (९५.५० टक्के), तर अथर्व केदार बापट (९५.३३ टक्के) याने तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत १९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, तर ११८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मेहिका हर्षद बोराटेने (९०.१६ टक्के) प्रथम, एसएन नागलक्ष्मीने (८९.६६ टक्के) द्वितीय, तर चैत्राली प्रवीण सुतार (८९.३३ टक्के) हिने तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत ५१ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, तर ३९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली. अन्विता महेश खोत (९७ टक्के) हिला प्रथम, दीक्षा श्रीनिवास होयसाळ (९४ टक्के) हिला द्वितीय, तर मानसी अमित सगदेव (९२ टक्के) हिला तृतीय क्रमांक मिळाला.
सुर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजमधील विज्ञान शाखेत ६६, वाणिज्य शाखेत ११६, कला शाखेत ४६ आणि एमसीव्हीसीमध्ये ९ विद्यार्थी होते. विज्ञान शाखेत ४७ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, तर १९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली. अद्वैत तुषार कुलकर्णी (९६.१ टक्के) याला प्रथम, तनया महेश गडवाल (९५.६७ टक्के) हिला द्वितीय, तर अंशुल सुनील पाटील (९४.६७ टक्के) याला तृतीय क्रमांक मिळाला आहे. वाणिज्य शाखेत १३ विद्यार्थी विशेष प्राविण्य, तर १०३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, झाचरियास नोआह नोयल (८७ टक्के) याने प्रथम, सीमा राधेश्याम यादव (८६.६६ टक्के) हिने द्वितीय, तर वृषंक विनय मराठे (८६.५ टक्के) याने तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत १९ विद्यार्थी विशेष प्राविण्य, तर १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, अनुश्री अभिजीत कुलकर्णी (९२ टक्के) याने प्रथम, कृष्णा प्रतिक सुराना (९१ टक्के) याने द्वितीय, तर इरा विजय नांदगावकर (८९ टक्के) हिने तृतीय क्रमांक पटकावला. एमसीव्हीसीमध्ये अभिषेक सिद्धनाथ कदम (८१.४४ टक्के) याला प्रथम, आर्यन श्रीकांत निकम (८१.११ टक्के) याला द्वितीय, तर प्रतीक प्रवीण शेळके (८०.४४ टक्के) याला तृतीय क्रमांक मिळाला.
सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, प्राचार्या किरण राव आणि शिक्षक वर्गाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “समर्पण आणि दृढ निश्चयाने केलेल्या मेहनतीचे फळ चांगलेच मिळते. आपल्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याने केला आहे. कोरोनाच्या कठिण काळातही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे.” प्रा. किरण राव यांनीही विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कौतुक केले आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके आणि पदके, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *