लसीकरणातील सुदर्शन केमिकल्सचा पुढाकार स्तुत्य

लसीकरणातील सुदर्शन केमिकल्सचा पुढाकार स्तुत्य

– अदिती तटकरे यांचे मत; सुदर्शन कंपनीतील कामगार व कुटुंबियांसाठी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

पुणे : कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी लसीकरण अतिशय महत्वाचे आहे. कंपनीतील सर्व कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण करण्यासाठी सुदर्शन केमिकल्सने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. रोहा व महाड येथील जवळपास बारा हजार नागरिकांना याचा लाभ होणार आहे,” असे मत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. 

सुदर्शन केमिकल्सच्या कामगार व कुटुंबियांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आले असून, पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते या मोहिमेचे सोमवारी उद्घाटन झाले. पुण्यातील साईश्री हॉस्पिटलच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

याप्रसंगी रोह्याचे प्रांताधिकारी यशवंतराव माने, रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, सुदर्शन केमिकल्सचा व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष वीज, मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख शिवालिका पाटील, रोहा प्लांट हेड विवेक गर्ग, व्यवस्थापन व सामाजिक बांधीलकी विभागाच्या प्रमुख माधुरी सणस आदी उपस्थित होते.

अदिती तटकरे म्हणाल्या, “रायगड आणि लगतच्या भागातील या कर्मचारी व नागरिकांना लसीकरण होणार आहे. आपल्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी उचलेले पाऊल कौतुकास्पद आहे. या मोहिमेतुन अधिकाधिक लसीकरण होईल. एमआयडीसी परिसरातील अधिकाधिक नागरिकांना लसीकरण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रोत्साहन द्यावे.”

राजेश राठी म्हणाले, “कर्मचाऱ्यांचे आरोग्य, त्यांची सुरक्षितता हा आमचा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित राहावेत, या भावनेतून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. सुदर्शन केमिकल्सचा वतीने चार टप्प्यात जवळपास १२ हजार लोकांचे लसीकरण केले जाणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *