‘सूर्यदत्ता कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१’चा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विश्वविक्रम

‘सूर्यदत्ता कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१’चा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विश्वविक्रम

जुन्या हिंदी व देशभक्तीपर गीतांवर आधारित सलग दोन तास

भारतीय संस्कृती व कलेचे दर्शन घडविणाऱ्या आर्टिस्टिक योगाची नोंद 
एकाग्रता, मनःशांतीसाठी योगसाधना गरजेची

– सरिताबेन राठी; ‘सूर्यदत्ता कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१’चा विश्वविक्रम

पुणे : जुन्या हिंदी व देशभक्तीपर गीतांच्या तालावर आधारित योग प्रात्यक्षिके, सलग दोन तास लयबद्ध सादरीकरण करत ‘सूर्यदत्ता कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१’ने विश्वविक्रम प्रस्थापित केला. सर्वाधिक वेळ, जास्तीत जास्त लोकांनी शरीर व मनाच्या सर्वांगीण विकासासाठी तालबद्ध आर्टिस्टिक योगा करण्याचा हा उपक्रम होता. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये सूर्यदत्ता फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या (एसएफएसए) वतीने ‘सुर्यदत्ता कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१’चे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तीपर गीतांच्या तालावर आधारित सलग दोन तास (Longest duration Yoga) विविध आसनांच्या माध्यमातून योग केला गेला. त्यातून भारतीय संस्कृती, कलेचा आणि आरोग्याचा अनोखा मिलाप पाहायला मिळाला.

या ‘कलाआरोग्यम् योगाथॉन’ची दखल विविध बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून घेतली गेली. ‘सूर्यदत्ता’च्या बावधन कॅम्पसमध्ये हे ‘योगाथॉन’ झाले. जवळपास १०० जणांनी यात सहभाग नोंदवला. प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या सरिताबेन राठी यांच्या हस्ते सलग दोन तास उत्कृष्ट योग सादरीकरणासाठी नयना गोडांबे, अभिश्री भोर, मारुती मारेकरी, सुचित्रा नायक, धीरज जबरे, कांचन बलदोटा यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ज्युरी म्हणून आयुर्वेदाचार्य वैद्य हरीश पाटणकर, योगपटू खुशी परमार, नुपूर पित्ती यांनी काम पाहिले.

प्रसंगी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया, प्रा. अक्षित कुशल, प्रा. किरण राव, प्रा. सुपर्णा भट्टाचार्य आदी उपस्थित होते. योगशिक्षिका सोनाली ससार व प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी योग प्रात्यक्षिकांचे संचलन केले. सायली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुनील धाडीवाल यांनी आभार मानले.

सरिताबेन राठी म्हणाल्या, “शरीर व मनाच्या तंदुरुस्तीसाठी योग महत्वाचा आहे. योगसाधनेमुळे मनःशांती लाभते. एकाग्रता वाढते. बदलत्या जीवनशैलीत आरोग्य चांगले राहण्यासाठी, तसेच मानसिक ताणतणाव नियंत्रित ठेवण्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. सकारात्मक दृष्टीकोन, आत्मसन्मान, रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियमित योग व ध्यानधारणा करायला हवी.

 

” शारीरिक आणि मानसिक प्रतिकारक्षमता वाढवण्यात योग अतिशय महत्वाचा आहे. नियमित योग आणि पोषक आहार घेतला, तर आपण सर्व प्रकारच्या आजारांना दूर ठेवू शकतो, असे वैद्य हरीश पाटणकर यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “योग म्हणजे कलेचा, क्रयशीलतेचा, नावीन्यतेचा, उपक्रमशीलतेचा, सकारात्मक विचारांचा स्रोत आहे. मन आणि शरीराच्या आंतरिक सौंदर्यासाठी योग करणे गरजेचे आहे. शिक्षक-शिक्षकेतर सर्वच कर्मचारी यामध्ये उत्साहाने सहभागी झाले. एकूण १०० लोकांनी सलग दोन तास कलेच्या सादरीकरणातून योग केल्याची विश्वविक्रमी नोंद झाली.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *