सूर्यदत्त विधी महाविद्यालयात प्रथम वर्षाचा स्वागत समारंभ
न्यायमूर्ती राजेश पाटील यांचे सूर्यदत्त विधी महाविद्यालयातील
प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहनासाठी तज्ज्ञांचे ‘सूर्यदत्त’मध्ये येणे गौरवास्पद
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त विधी महाविद्यालयात प्रथम वर्षाचा स्वागत समारंभ
पुणे, दि. २१ – “एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन कसा आहे, त्याप्रमाणे तुमचे जीवन घडत जाते. त्यामुळे नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत, उत्कृष्टतेचा ध्यास बाळगायला हवा. वकिली करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कायदेविषयक पुस्तक वाचनाचे वेड लावून घ्यावे,” असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश पाटील (Justice Rajesh Patil of the Bombay High Court) यांनी केले. पाटील यांचे मार्गदर्शन २०० विद्यार्थ्यांसाठी उत्साही, प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक ठरले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या (लॉ कॉलेज) प्रथम वर्षाचा स्वागत समारंभ ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया (The first year reception ceremony of Suryadatta Law College run by Suryadatta Education Foundation was attended by the founder president of ‘Suryadatta’, Prof. Dr. Sanjay B. Chordia and vice president and secretary Sushma Chordia.) यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेश पाटील बोलत होते. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी पाटील यांच्या पत्नी, जेजुरीतील मार्तंड देवस्थानचे विश्वस्त व सूर्यदत्त विधी महाविद्यालयाचे सल्लागार मंडळ सदस्य ऍड. पांडुरंग थोरवे, प्राचार्या केतकी बापट, डॉ. मोनिका सेहरावत यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेश पाटील यांनी आपल्या आयुष्यातील हृदयस्पर्शी प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. (Rajesh Patil encouraged the students by sharing heartwarming incidents from his life.) ते म्हणाले, “प्रत्येक गोष्टीला एक चांगला, तर दुसरा वाईट पैलू असे दोन पैलू असतात. तुम्ही कोणत्या पैलूचा स्वीकार करता, त्यावर तुमच्या जीवनाचा प्रवास ठरतो. सुरुवातीच्या काळात वकिली व्यवसायाकडे गांभीर्याने पाहिले आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या पिढीतील विद्यार्थी भाग्यवान असून, त्यांना फारसा संघर्ष करावा लागत नाही. आपले पालक आपल्या सर्व गरजा पुरवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन यशस्वी व्हावे.”
“आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी वाचन खूप गरजेचे असते. वकिलीशी संबंधीत पुस्तकांचे वाचन तर जरूर कराच; पण अवांतर वाचनही करा. त्यातून तुमचा दृष्टीकोन, समज आणि वैचारिक भूमिका अधिक व्यापक होत जाते. वकिली करताना अनेक केसेसमध्ये संदर्भ देण्याची दृष्टी मिळते. डॉ. अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख पुस्तकाचे वाचन करताना मला अनेक गोष्टी भावल्या. त्यातील काही उदाहरणे माझ्या वकील मित्रांना बाजू मांडताना उपयोगी पडतात. या पुस्तकातील चांगल्या विचारांचा संदर्भ न्यायिक बाजू मांडताना देता येतो,” असे त्यांनी नमूद केले.
(Prof. Dr. Sanjay chordiya said)प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सन्माननीय न्यायमूर्ती राजेश पाटील कोणतीही कायदाविषयक पार्श्वभूमी नसताना या पदावर पोहोचले आहेत. त्यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी शिक्षकाची आहे. त्यांच्या कुटुंबातील ते पहिलेच वकील असून, सध्या न्यायमूर्ती म्हणून सेवा देत आहेत. त्यांच्यासारख्या आदर्श व्यक्तिमत्वाचे विचार ऐकण्याची संधी सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व सभासदांना मिळाली, हे आनंददायी आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी अशा तज्ज्ञ मंडळींना सूर्यदत्तामध्ये नेहमीच आमंत्रित केले जाते. त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, निकोप दृष्टीकोन तयार होण्यास मदत मिळते.”
(Prof. Ketki bapat )प्रा. केतकी बापट यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित सूर्यदत्त विधी महाविद्यालयाची सुरुवात २०२२ मध्ये झाली. शाश्वत, जागतिक दर्जाचे आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण देण्यासाठी सूर्यदत्त संस्था ओळखली जाते. आज सूर्यदत्त विधी महाविद्यालयात बीएएलएलबी, बीबीएएलएलबी, एलएलबी, एलएलएम आणि इतर पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते.
