वंदे मातरम् संघटनेच्या टीमकडून  काश्मीरमधील जवानांना फराळ

वंदे मातरम् संघटनेच्या टीमकडून  काश्मीरमधील जवानांना फराळ

 
 
पुणे, दि. ८ – वंदे मातरम् संघटनेच्या टीमकडून  ( From the Vande Mataram organization team  ) जम्मू-काश्मीरमधील जवानांना फराळ वाटप करण्यात आला. काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौक, हरिसिंग स्ट्रीट, पंचमुखी हनुमान मंदिर यासह सीमेवर तैनात जवानांना दिवाळी फराळ देऊन वंदे मातरम् संघटनेने देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
 
तसेच कार्तिक पौर्णिमा आणि वैकुंठ चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर येथे कायमस्वरूपी बसवलेल्या गणपतीची विधिवत पूजा व भंडारा संपन्न    (On the auspicious occasion of Kartik Purnima and Vaikuntha Chaturdashi, the Ganapati idol permanently installed here is duly worshipped and Bhandara is performed. ) झाला. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, भारतमाता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
 
यावेळी वंदे मातरम् संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सचिन जामगे, आयटी व माहिती अधिकार अध्यक्ष विशाल शिंदे, संपर्क प्रमुख अमोल भुरेवार, मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व जवान तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *