वाचनसंस्कृती रुजविण्यात ‘सूर्यदत्त’चा पुढाकार कौतुकास्पद मान्यवरांकडून कौतुक

वाचनसंस्कृती रुजविण्यात ‘सूर्यदत्त’चा पुढाकार कौतुकास्पद मान्यवरांकडून कौतुक

 ‘सूर्यदत्त’तर्फे पुणे पुस्तक जत्रेत ‘सर्वांसाठी मोफत पुस्तके’ उपक्रम
 
वाचन-लेखन, विचार व ज्ञान हे प्रगतीच्या मार्गावर नेणारे पैलू
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; ‘सूर्यदत्त’तर्फे पुणे पुस्तक जत्रेत ‘सर्वांसाठी मोफत पुस्तके’ उपक्रम
 
पुणे, दि. ५ – तरुणपिढीमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनने राबविलेला ‘सर्वांसाठी मोफत पुस्तके’ हा उपक्रम स्तुत्य आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून पुस्तकांची भेट देत ‘सूर्यदत्त’ने सामाजिक बांधिलकीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. या उपक्रमाने वाचनसंस्कृती, ज्ञानवृद्धी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी कौतुक केले.
 
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने नुकत्याच झालेल्या पुणे पुस्तक जत्रेत ‘सूर्यदत्त’तर्फे ‘सर्वांसाठी मोफत पुस्तके’ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणाऱ्या खास स्टॉलचा सहभाग लक्षणीय होता. (The recent Pune Book Fair, held in collaboration with the Maharashtra Sahitya Parishad, featured a special stall by ‘Suryadutt’ offering ‘Free Books for All’ and honoring meritorious students.)   या स्टॉलला अनेक मान्यवरांनी भेटी देत ‘सूर्यदत्त’च्या कार्याचे कौतुक केले. ही उपक्रमशीलता ‘सूर्यदत्त’च्या साहित्यप्रेम, समाजसेवा आणि शिक्षणातील सर्वसमावेशक दृष्टीकोनाचे जिवंत उदाहरण ठरल्याचेही मान्यवरांनी नमूद केले. या उपक्रमात सुमारे ८०० हून अधिक मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, पुस्तक जत्रेतील सुमारे ६५ स्टॉलपैकी ‘सूर्यदत्त’चा एकमेव स्टॉल होता, जिथे भेट देणाऱ्या प्रत्येक रसिकाला आवडीचे पुस्तक मोफत दिले जात होते.
 
‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली (Under the guidance of ‘Suryadatta’ founder president Prof. Dr. Sanjay B. Chordia) आयोजित या उपक्रमामध्ये ‘सूर्यदत्त’च्या वतीने २०२४-२५ मध्ये दहावी व बारावीमध्ये ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’, सुवर्णपदक आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालक-शिक्षकांमध्ये उत्साह संचारला. साहित्य, कला आणि समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी अनेक साहित्यिक, कलाकार आणि समाजसेवकांना ‘सूर्यदत्त सुवर्णपदक’ आणि पुस्तके देऊन गौरवण्यात आले.
‘सूर्यदत्त’च्या जनसंपर्क विभाग व्यवस्थापिका स्वप्नाली कोगजे यांनी उपक्रमाचे यशस्वी संयोजन केले. सोशल मीडिया व दृश्य-श्राव्य सादरीकरण खुशी वाधवानी आणि चिन्मय सागर यांनी केले. प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.
 
शिक्षण हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम
शिक्षण म्हणजे केवळ करिअर नव्हे, तर समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. पुस्तक जत्रेच्या माध्यमातून वाचनसंस्कृती, कला आणि ज्ञानाचा सुंदर संगम घडवून ‘सूर्यदत्त’ने समाजाला नवी प्रेरणा दिली. मोफत पुस्तक भेट देत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करीत आम्ही ज्ञान, परिश्रम आणि यशाचा उत्सव साजरा केला. ‘ज्ञानाची वाटणी हीच खरी समाजसेवा’ मानून होणाऱ्या अशा उपक्रमांमुळे वाचनसंस्कृती बहरते, विचारांचा विस्तार होत सजग, संवेदनशील समाजाची निर्मिती होते. ‘सूर्यदत्त’ने राबविलेला हा उपक्रम वाचनप्रेमी, साहित्यरसिक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. समाजाशी नाळ जपणारा, मूल्याधारित आणि संवेदनशील संस्थात्मक दृष्टिकोन म्हणून ‘सूर्यदत्त’ पुन्हा एकदा सर्वांच्या मनात उजळून निघाला आहे.
– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *