पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या ‘अजिंक्य’ मॅस्कॉटचे अनावरण

पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या ‘अजिंक्य’ मॅस्कॉटचे अनावरण

 
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान ३७ स्पर्धांचे आयोजन

पुणे, दि. २६ – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या ‘मॅस्कॉट’चे अनावरण नुकतेच करण्यात आले. या मॅस्कॉटचे नाव ‘अजिंक्य’  (The mascot of the first MP Sports Festival was unveiled recently. The mascot is named ‘Ajinkya’. )     असे आहे. अर्जुन पुरस्कार विजेते ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मोहिनी चाफेकर व स्पर्धेचे मुख्य समन्वयक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे, आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा भोसले आदी उपस्थित होते.

 
‘फिट युवा फॉर विकसित भारत’ (‘Fit Youth for Developed India’ )   या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ येत्या २ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२५  (The first ‘Khasdar Sports Festival’ will be held from November 2 to November 16, 2025.) दरम्यान पार पडणार आहे. या १५ दिवसीय महोत्सवात शहरातील विविध मैदानांवर एकूण ३७ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होणार आहे.
मनोज एरंडे म्हणाले, “भारतीय पारंपरिक आणि ऑलिम्पिकमधील खेळांचा यात समावेश आहे. सांघिक व एकेरी प्रकारात या स्पर्धा होणार आहेत. आर्चरी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, स्विमिंग, बास्केटबॉल, बॉडी बिल्डिंग, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, सायकलिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, पिकलबॉल, रोलबॉल, शूटिंग, स्केटिंग, सॉफ्टबॉल, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, व्हॉलीबॉल, वॉल क्लायम्बिंग, वॉटर पोलो, वेट लिफ्टिंग, कुस्ती, वुशू, योग, स्क्वॅश यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी विशेष ऍथलेटिक्स व ज्येष्ठांसाठी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी मनोज एरंडे (९८२२०४५१०१) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *