बंगाली ढाक आणि ढोल ताशाच्या गजरात रंगली माता कालीची मिरवणूक

बंगाली ढाक आणि ढोल ताशाच्या गजरात रंगली माता कालीची मिरवणूक

 

 

पुणे, दि. २४ –  पश्चिम बंगालच पारंपारिक वाद्य ढाक चे आकर्षक सादरीकरण त्यात ढोल ताशांचा निनाद,पारंपारिक बंगाली वेशभूषा करून सहभागी झालेल्या महिला व पुरूष अशा प्रसन्न वातावरणात माता काली च्या मूर्तीची मिरवणूक थाटात पार पडली. निमित्त होते बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाच्या समारोपाचे.

बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाच्या समारोपा निमित्त  (On the occasion of the conclusion of the Sri Sri Shyama Kali Puja festival celebrated by the Bengali community )  काढण्यात आलेल्या मिरवणुकीची सुरुवात आर.सी.एम हायस्कूल फडके हौद,कसबा पेठ ते वृद्धेश्वर घाट येथे संपन्न झाली.यावेळी पुणे शहर सार्वजनिक काली पूजा कमिटीचे सेक्रेटरी सुब्रतो मजुमदार, विनोद संतरा- खजिनदार ,अमर माझी-उपसेक्रेटरी ,अनुप माईती – सदस्य , महादेव माझी – सदस्य ,पूनचंद्र दास- सदस्य, संकेत मजुमदार आदि मान्यवरांसाह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातृशक्तीचे प्रतीक असलेल्या देवी कालीच्या भक्तांचा हा भावनिक व श्रद्धेचा सोहळा तीन दिवस वैविध्य कार्यक्रमांनी रंगला. सिंदूर खेला आणि देवीच्या विसर्जन मिरावणुकीसाठी महिला पारंपारिक बंगाली वेशभूषा परिधान करून सहभागी झाल्या होत्या.

कोलकाता मधून पुण्यात आलेल्या सुवर्ण कारागिरांनी या महोत्सवाची सुरुवात केली होती. पुण्यातील बंगाली समाजासह विविध धर्मीय व सांस्कृतिक घटकांना एकत्र आणणारा हा उत्सव गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक ऐक्य, भक्ती आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत आला आहे. यंदा या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्षे होते. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवामुळे आम्हाला एकत्र येण्याची आणि मातेची सेवा करण्याची संधी मिळाल्याची भावना बंगाली महिलांनी या प्रसंगी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *