फोक आख्यान, राहुल देशपांडे यांच्या  गायनाने सजणार ‘कोथरूड सुरोत्सव’

फोक आख्यान, राहुल देशपांडे यांच्या  गायनाने सजणार ‘कोथरूड सुरोत्सव’

 
 
पुणे, दि. १५-  मराठी लोककलेचा वारसा सांगणारे द फोक आख्यान, राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने यंदाचा कोथरूड सुरोत्सव  (This year’s Kothrud Surotsav features The Folk Akhyan, a story that tells the heritage of Marathi folk art, and classical singing by Rahul Deshpande.)   सजणार आहे. येत्या गुरुवारी (ता. १६) व शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी ५.३० वाजता आयडियल कॉलनी मैदान, पौड रस्ता, पुणे येथे ही स्वर मैफल रसिकांना अनुभवता येणार आहे.
 
मयूर कॉलनी-कोथरूड प्रभाग ३१ मधील माजी नगरसेवक माथवड यांच्या वतीने हा संगीत, संस्कृती आणि कलेचा त्रिवेणी संगम रंगणार आहे. गुरुवारी मराठी कलेचा उत्सव ‘द फोक आख्यान’ सादर होणार आहे.  (The Marathi art festival ‘The Folk Akhyan’ will be presented on Thursday.)    तर शुक्रवारी दिवाळी संध्या सांगीतिक मैफिलीत राहुल देशपांडे, गायिका संहिता चांदोरकर यांचे बहारदार सादरीकरण होईल. अभिनेत्री स्पृहा जोशी हिचे ओघवते निवेदन श्रोत्यांना पर्वणी असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *