प्रशिक्षणाने महिलांच्या जीवनात आत्मविश्वास व संधी वाढतील  – उपअधीक्षक अशोक कदम

प्रशिक्षणाने महिलांच्या जीवनात आत्मविश्वास व संधी वाढतील – उपअधीक्षक अशोक कदम

 त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनच्या वतीने ‘संखारा प्रशिक्षण’
 
पुणे दि. १८-  आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात महिलांनी स्वतःला सक्षम करणे ही काळाची गरज आहे. केवळ कुटुंबापुरते मर्यादित न राहता शिक्षण, रोजगार, सामाजिक क्षेत्रातही त्यांना आपला ठसा उमटवायचा आहे. यासाठी आवश्यक आत्मविश्वास, कौशल्य आणि संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे,” असे मत गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक अशोक कदम यांनी व्यक्त केले.(“It is important to provide confidence, skills and opportunities,” said Ashok Kadam, Deputy Superintendent of Police, Crime Branch.)

त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनच्या वतीने औंध येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आयोजित ‘संखारा प्रशिक्षण’ कार्यक्रमाच्या समारोपावेळी अशोक कदम बोलत होते.  (Ashok Kadam was speaking at the conclusion of the ‘Sankhara Training’ program organized by Trisharan Enlightenment Foundation for Anganwadi workers and helpers in Aundh.)     ‘त्रिशरण’च्या व्यवस्थापकिय संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे  (Mrs. Pragya Waghmare, Managing Director of ‘Trisharan’)    यांच्या मार्गदर्शनात सहा दिवसांचे हे प्रशिक्षण झाले. प्रसंगी फाउंडेशनचे महाराष्ट्र व्यवस्थापक प्रशांत वाघमारे, प्रशिक्षण समन्वयक सांची वाघमारे, अर्चना बनकर, मिताली गायकवाड, निवेदिता वाघमारे व लताबाई धायगुडे यांच्यासह पदाधिकारी व प्रशिक्षक उपस्थित होते. 

प्रज्ञा वाघमारे म्हणाल्या, “स्त्रियांमध्ये अपार क्षमता आहे; मात्र योग्य दिशादर्शन आणि प्रशिक्षण मिळाले तरच त्या क्षमतेला आकार येतो. या प्रशिक्षणातून महिलांना आत्मविश्वास वाढविण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा मार्ग खुला होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच व्यावसायिक क्षेत्रातही त्यांना संधी मिळेल. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.”

 
हे प्रशिक्षण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण बनवण्याच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे. हा कार्यक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित न राहता, सहभागी महिलांच्या जीवनात नवीन आशा आणि संधींचे दार उघडणारा ठरला आहे, असे प्रशांत वाघमारे म्हणाले.
 
या प्रेरणादायी प्रशिक्षणात ७० सेविका आणि मदतनीस उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. यावेळी सहभागी महिलांनी मनोगत व्यक्त करताना प्रशिक्षणामुळे त्यांच्या जीवनात आलेला सकारात्मक बदल आणि नवीन आत्मविश्वास यांचा उत्साहाने उल्लेख केला. तीन दिवस प्रज्ञा वाघमारे, तर तीन दिवस प्रशांत वाघमारे यांनी प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *