श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा गणेशोत्सव ; भारतासह परदेशातूनही ट्रस्टच्या फेसबुक, यू ट्यूब, वेबसाईट सह इतर सोशल मीडियावर गणेशभक्तांची भेट
पुणे, दि. ३ – केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन अनेकांना प्रत्यक्ष घेता आले नसले, तरी आॅनलाईन माध्यमातून उत्सवाचा आनंद जगभरातील भाविक (Although many were unable to have the darshan of the rich Dagdusheth Halwai Ganpati in person, devotees from all over the world can enjoy the festival online.) घेत आहेत.
महाराष्ट्रात पुण्यासह मुंबई, बंगळुरु, ठाणे, नाशिक, सूरत, नागपूर या शहरांतून गणेशभक्त वेबसाईट, फेसबुक, यू ट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सोशल मीडियावर बाप्पाचे दर्शन घेत आहेत. तर, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, दुबई, जर्मनी, ऑस्ट्रेलियासह थायलंडमधून देखील ट्रस्टच्या सोशल मीडियावर तब्बल ५० लाखांहून अधिक गणेशभक्तांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन (More than 5 million Ganesh devotees have seen the Dagdusheth Ganesha on social media) घेतले आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षीचा गणेशोत्सव सुरु आहे. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम सुरु झाले. तेव्हापासून ट्रस्टच्या आॅनलाईन सेवांच्या माध्यमातून लाखो भाविक दर्शन घेत आहेत. वेबसाईटवरुन दररोज सकाळी व रात्री होणारी लाईव्ह आरती व दर्शन देखील गणेशभक्त घेत आहेत. भाविकांना ट्रस्टतर्फे विविध आॅनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सव सुरु झाल्यानंतर सुमारे २७ लाख भाविक फेसबुकवरुन, इन्स्टाग्रामवर २३ लाख यांसह ३ लाखांहून अधिक यूटयूब व अॅप वरुन देखील गणेशभक्तांनी भेट दिली आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सव काळात आजपर्यंत तब्बल ५० लाखांहून अधिक गणेशभक्तांनी आॅनलाईन दर्शनाचा लाभ (During this year’s Ganeshotsav, more than 50 lakh Ganesh devotees have benefited from online darshan till date. ) घेतला आहे. डिजीटल माध्यमातून ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांना देखील भक्त जोडले गेले आहेत.
उत्सवकाळात भारतासह परदेशातील गणेशभक्तांना घरच्या घरी श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली असून ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन सुविधांचा देखील लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.