‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी साजरे केले कर्णबधीर मुलांसोबत रक्षाबंधन

‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी साजरे केले कर्णबधीर मुलांसोबत रक्षाबंधन

 
 
कर्णबधीर मुलांसमवेत ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थ्यांचे अनोखे रक्षाबंधन
 
रक्षाबंधन हा प्रेम व संरक्षणाचा सण: प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
कर्णबधीर मुलांसमवेत रक्षाबंधन साजरे करीत ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थ्यांनी जपली सर्वांना सामावून घेणारी संस्कृती
 
पुणे, दि. १५- “रक्षाबंधन हा सण निःस्वार्थ प्रेम, आपुलकी, बंधुभाव आणि एकमेकांची काळजी घेण्याचे प्रतीक आहे. सर्वांना सामावून घेणारा हा सण कर्णबधीर मुलांसमवेत साजरा करत सूर्यदत्त संस्थेच्या विद्यार्थ्यांनी संस्कृती जपली आहे. यातून मुलांमधील सामाजिक बांधिलकी, सहानुभूती आणि भारतीय परंपरांविषयी असलेली श्रद्धा दिसून येते,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया  (Founder Chairman of Suryadutt Education Foundation Prof. Dr. Sanjay B. Chordia)   यांनी केले.
 
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटीअंतर्गत असलेल्या डॉ. सायरस पूनावाला स्कूल ऑफ हिअरिंग इम्पेअर्ड (कर्णबधीर मुलांची शाळा) लुल्लानगर येथे जाऊन रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत कर्णबधीर मुलांमध्ये आनंद वाटला. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्यासह इंडियन रेड क्रॉस सोसायटी पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. विक्रम फाटक आणि कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. सीमा रेठरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा आनंदोत्सव पार पडला. यामध्ये डॉ. क्षितिजा घोले, डॉ. आकांक्षा वडोदकर यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे समन्वयक भारती कांबळे यांनी कार्यक्रमाचे केले होते. ‘सूर्यदत्त’मधील मुलांनी कर्णबधीर मुलांनी, तर स्कुल ऑफ हिअरिंग इम्पेअर्डमधील मुलांनी ‘सूर्यदत्त’च्या मुलांना राखी बांधली. यावेळी विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत, हावभावांच्या माध्यमातून संवाद साधत एकमेकांशी आत्मीयता वाढवली. कार्यक्रमाचा समारोप कृतज्ञता व्यक्त करून, प्रेमाची देवाण-घेवाण करून, आणि लहानशा भेटवस्तू देऊन झाला.
 
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन गेली २५ पेक्षा जास्त वर्षे शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान देत असून, ‘एन्लायटनिंग अँड एनरीचिंग जनरेशन्स’ या ब्रीदवाक्याखाली समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी दाखवलेली ही आपुलकी आणि प्रेमाची भावना समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे, अशी भावना उपस्थितांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *