सीबीएसई झोनल बॉक्सिंगमध्ये सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या राजवीर सूर्यवंशीला सुवर्ण, तर भक्ती ननावरेला रौप्यपदक

सीबीएसई झोनल बॉक्सिंगमध्ये सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या राजवीर सूर्यवंशीला सुवर्ण, तर भक्ती ननावरेला रौप्यपदक

राजवीर सूर्यवंशी, भक्ती ननावरे यांची कामगिरी
‘सूर्यदत्त’साठी अभिमानास्पद: प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

पुणे, दि. १३- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ व एमडीएन फ्युचर स्कुलच्या वतीने लाखनी (भंडारा) येथे आयोजित सीबीएसई झोनल लेव्हल बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या राजवीर अमित सूर्यवंशी याने उल्लेखनीय कामगिरी करीत सुवर्णपदक,  (Rajveer Amit Suryavanshi of Suryadutt National School won a gold medal in the CBSE Zonal Level Boxing Championship with a remarkable performance. )   तर भक्ती ननावरे हिने रौप्यपदक पटकविले. सोबतच राजवीरने ‘बेस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर’ हा किताबही मिळवला.

सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या राजवीर अमित सूर्यवंशी (इयत्ता अकरावी, विज्ञान शाखा) आणि भक्ती ननावरे यांनी लाखणी येथे एमडीएन फ्यूचर स्कूलच्या वतीने आयोजित सीबीएसई झोनल लेव्हल बॉक्सिंग स्पर्धा २०२५–२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.  (Rajveer Amit Suryavanshi (Class XI, Science Branch) and Bhakti Nanavare of Suryadatta National School achieved a historic feat in the CBSE Zonal Level Boxing Tournament 2025–26 organized by MDN Future School at Lakhani. ) सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांनी राजवीर आणि भक्तीच्या या कामगिरीचे कौतुक करत सूर्यदत्त संस्थेसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे नमूद केले.

१७ वर्षे वयोगटाखालील ६०-६३ किलो वजन गटात झालेल्या लढतीत राजवीरने आपल्या चपळ हालचाली, सुयोग्य आक्रमण, कलात्मक बचाव आणि उत्कृष्ट डावानी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. एकूण १३० झुंजींच्या स्पर्धेत त्याची कामगिरी सर्वाधिक उल्लेखनीय ठरली. सुवर्णपदकासोबतच त्याला १७ वर्षाखालील गटातील खेळाडूंमध्ये ‘बेस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर ऑफ द टूर्नामेंट’ हा मानाचा किताबही देण्यात आला. भक्तीने ८० किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले. प्रशिक्षक मृणाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजवीरने पुण्यासाठी ही अभिमानास्पद कामगिरी केली.

(Prof. Dr. Sanjay chordiya said)प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त नॅशनल स्कूल गुणवत्तापूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि क्रीडा विकासासाठी विशेष प्रसिद्ध आहे. आधुनिक सुविधा, अनुभवी शिक्षकवर्ग आणि मूल्याधारित शिक्षणाच्या जोरावर हे विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे केंद्र ठरले आहे. राजवीर व भक्तीची ही कामगिरी ‘सूर्यदत्त’साठीच नव्हे, तर पुण्यासाठी अभिमानास्पद आहे. दोघांच्याही परिश्रम, शिस्त आणि चिकाटीचे हे सुंदर फळ आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याला आमचे प्राधान्य आहे.”

सुषमा चोरडिया यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, दोन्ही विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे सूर्यदत्त परिवाराचा गौरव अधिक वाढला आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा आणि कला क्षेत्रातही उत्तुंग झेप घ्यावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांच्या या विजयामुळे आता त्याची निवड राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी झाली असून, त्याच्या पुढील प्रवासासाठी सूर्यदत्त परिवार शुभेच्छा देत आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *