महर्षीनगरमध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते पुष्कर प्रसाद आबनावे यांचा अनोखा उपक्रम

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या रक्तदानाने शिबिराला सुरुवात झाली. २२ रक्तदात्यांची पहिल्यांदाच रक्तदान केले. स्वतः पुष्कर आबनावे यांनी रक्तदान करत इतरांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे राम बांगड (Ram Bangad) शिबिराला उपस्थित राहत रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड (Abhay Chhajed) यांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
पुष्कर प्रसाद आबनावे म्हणाले, “प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ७३ रक्त पिशव्या संकलित करून अभिवादन करण्यात आले. राम बांगड आणि अभय छाजेड यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा प्रेरणादायी ठरल्या. शिबिराला युवक, महिला, पुरुषांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सामाजिक भावनेतून कार्य (Social Work) करताना कायमच आनंद मिळतो.”